जाणून घ्या…निकाल कधी जाहीर होणार?
नवी दिल्ली (India Caste Census 2025) : 1947 पासून आजपर्यंत भारतात जातीय जनगणना झालेली नाही? आता केंद्र सरकारने एक ऐतिहासिक आणि मोठे पाऊल उचलले आहे. येत्या (India Caste Census 2025) जनगणनेत जातीचा डेटा समाविष्ट केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राजकीय व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या (CCPA) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
#WATCH | Delhi | "Cabinet Committee on Political Affairs has decided today that Caste enumeration should be included in the forthcoming census," says Union Minister Ashiwini Vaishnaw on Union Cabinet decisions. pic.twitter.com/0FtK0lg9q7
— ANI (@ANI) April 30, 2025
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) म्हणाल्या की, ‘अनेक राज्यांनी त्यांच्या पातळीवर जात सर्वेक्षण केले. परंतु ते वैज्ञानिक आणि पारदर्शक नव्हते. यामुळे समाजात संशय निर्माण झाला. म्हणूनच आता जात गणना, (India Caste Census 2025) जनगणनेचा भाग बनवली जात आहे. जेणेकरून हे काम पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने होईल.
जात जनगणना कधी होणार?
सरकारची योजना आहे की, (India Caste Census 2025) जनगणना प्रक्रिया सप्टेंबर 2025 पासून सुरू होऊ शकेल. संपूर्ण काम 2 वर्षात पूर्ण होईल, म्हणजेच अंतिम आकडेवारी 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीला येऊ शकते.
राज्यांचा अनुभव आणि राजकारणाचा रंग
2022 मध्ये सर्व जातींची गणना (Caste Census) पूर्ण करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशनेही अलीकडेच जात सर्वेक्षण केले. काही पक्षांनी केवळ राजकीय फायद्यासाठी (India Caste Census 2025) जातीय जनगणनेचा वापर केल्याचा सरकारचा आरोप आहे.