नवी दिल्ली/ मुंबई (Hurun India Rich List 2024) : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानबद्दल (Shah Rukh Khan) एक मोठी बातमी आली आहे. शाहरुख खान या यादीचा एक भाग बनला आहे, ज्यामध्ये सुमारे 150 कोटी भारतीयांपैकी केवळ 1539 लोकांना स्थान मिळाले आहे. Hurun India Rich List 2024 ची प्रसिद्ध यादी तयार करण्यात आली असून, त्यामध्ये शाहरुख खानला स्थान मिळवले आहे. या यादीत शाहरुखची संपत्ती 7300 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. शाहरुख खानने कोलकाता नाईट रायडर्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटमधील मोठ्या भागीदारीमुळे या यादीत हे स्थान बनवले आहे.
देशाच्या लोकसंख्येपैकी फक्त 0.0001% लोक या यादीत
देशाची लोकसंख्या 150 कोटींच्या आसपास असतांना, (Hurun India Rich List) हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये फक्त 1539 लोकांना स्थान मिळाले आहे. जर त्याची टक्केवारीत गणना केली तर ती लोकसंख्येच्या अंदाजे 0.0001 टक्के आहे.
या यादीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे
या यादीत (Shah Rukh Khan) शाहरुख खानशिवाय इतर सेलिब्रिटींचाही समावेश आहे. या यादीत अमिताभ बच्चन यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. त्यात बॉलीवूड अभिनेत्री (Juhi chawala) जुही चावलानेही स्थान निर्माण केले आहे. 4600 कोटी रुपयांच्या संपत्तीसह जुही चावला दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत सेलिब्रिटी आहे.
हे भारतातील सर्वात श्रीमंत लोक
या यादीत प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) आणि अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्या नावाचाही समावेश आहे. या यादीनुसार, हृतिक रोशनची एकूण संपत्ती सुमारे 2000 कोटी रुपये आहे. हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत लोकांचा समावेश होतो. ही (Hurun India Rich List) यादी वेगवेगळ्या टप्प्यात तयार केली जाते. याची तयारी करण्यासाठी देशातील श्रीमंतांशी संबंधित आर्थिक डेटा गोळा केला जातो.