वॉशिंग्टन/नवी दिल्ली (India-US Accident) : अमेरिकेत एका भीषण कार (America Accident) अपघातात भारतीय वंशाच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील (Georgia University) जॉर्जिया राज्यातील अल्फारेटा शहरात हा भीषण कार अपघात झाला आहे. यामध्ये भारतीय वंशाच्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. (Alpharetta Police) अल्फारेटा पोलिसांनी सांगितले की, वेस्टसाइड पार्कवेवरील अपघाताच्या प्राथमिक तपासात, अपघात झालेल्या कारमध्ये पाच लोक होते, सर्व सुमारे 18 वर्षांचे विद्यार्थी होते.
अमेरिकेत भीषण कार अपघात
अल्फारेटा पोलिसांनी (Alpharetta Police) एका निवेदनात म्हटले आहे की, घटनास्थळावरील पुराव्याच्या आधारे, ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले, त्यानंतर कार झाडावर आदळली आणि नंतर उलटली. अल्फारेटा हायस्कूलचा विद्यार्थी आर्यन जोशी, जॉर्जिया विद्यापीठाची विद्यार्थिनी श्रिया अवसरला आणि अन्वी शर्मा अशी मृत भारतीय विद्यार्थ्यांची नावे आहेत. अपघातानंतर आर्यन जोशी आणि श्रिया अवसरला यांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित तीन विद्यार्थ्यांना उपचारासाठी (Alpharetta Hospital) नॉर्थ फुल्टन रुग्णालयात नेण्यात आले, तेथे अन्वी शर्मा यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अल्फारेटा हायस्कूलचा विद्यार्थी मोहम्मद लियाकथ आणि (Georgia University) जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी रित्वक सोमपल्ली हे वाहन चालवत होते, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक
या दुर्घटनेनंतर जॉर्जिया विद्यापीठाने सांगितले की, (Georgia University) जॉर्जिया विद्यापीठाने या दुःखद अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. या कठीण काळात पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांप्रती आमची तीव्र संवेदना आहे. आम्ही आशा करतो की त्यांच्या आठवणी कायम राहतील. त्याला ओळखणाऱ्या सर्वांना सांत्वन देईल आणि शक्ती देईल.
अपघाताचे कारण अतिवेग
अपघाताचा तपास सुरू असला तरी, प्राथमिक तपासात वेगामुळे हा (America Accident) अपघात झाल्याचे समजते. अपघाताचा तपास सुरू असताना वेस्टसाइड पार्कवे मॅक्सवेल रोड ते हेंबरी रोडपर्यंत थोडक्यात बंद करण्यात आला होता, असे अल्फारेटा पोलिसांनी सांगितले. माहितीनुसार, अन्वी शर्मा आणि श्रिया अवसरला यांनी अलीकडेच (Georgia University) जॉर्जिया विद्यापीठात त्यांचे पहिले वर्ष पूर्ण केले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, शर्मा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्याच वेळी आर्यन जोशी लवकरच पदवीधर होणार होता.