नवी दिल्ली (India weather) : संपूर्ण देशात उष्णतेची लाट (India weather) पसरत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यातच उष्णतेने लोक हैराण झाले आहे. प्रचंड उकाडा आणि उष्णतेच्या लाटेमुळे लोकांचे हाल झाले आहेत. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, ज्या भागात लोक उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी जातात, त्याच भागात सध्या कडक उन्हाचा फटका बसलाआहे.
हिल स्टेशनने मोडला उष्णतेचा विक्रम
देशातील सर्वात थंड ठिकाणे आणि हिल स्टेशन (Hill station) म्हणून दावा करणारे भाग यावेळी देखील उन्हाने तापत आहेत. दक्षिण भारतातील प्रसिद्ध हिल स्टेशन ‘उटी’मध्ये उष्णतेने सर्व विक्रम मोडले आहेत. यावेळी 73 वर्षात उटीमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट, जाणून घ्या देशातील हवामान अपडेट
सर्वात वाईट दिवसाचे तापमान
काल उटीचे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 1951 पासून उटीमध्ये एप्रिल महिन्यात नोंदवलेले हे केवळ सर्वोच्च तापमानच नाही. 1951 नंतरच्या सर्वात उष्ण दिवसाचाही हा विक्रम आहे. केवळ बेंगळुरूच नाही तर, उटी आणि पलक्कड येथेही त्यांचे सर्वात वाईट किंवा जवळपास सर्वात वाईट दिवसाचे तापमान नोंदवले जात आहे.
विक्रमी तापमानाची नोंद
गेल्या 73 वर्षांत पहिल्यांदाच उटीमध्ये विक्रमी तापमानाची नोंद झाली. नुकतेच तामिळनाडू हवामान खात्याने जाहीर केले आहे. उटीचे तापमान 29 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. सामान्य दिवशी (Ooty weather) उटीमध्ये तापमान केवळ 5.4 अंश राहते. याचाच अर्थ उटीमध्ये हवामान बदलले आहे.
लोकप्रिय पर्यटन स्थळ अति उष्ण
एप्रिल 1951 मध्ये उटी येथे शेवटच्या वेळी 29 अंश तापमानाची नोंद झाली होती. 73 वर्षांनंतर हेच तापमान 29 अंशांवर आले आहे. दर उन्हाळ्यात उटीला भेट देणाऱ्या व्हीआयपींनाही आपला विचार बदलावा लागेल. किंबहुना, उटी व्यतिरिक्त, पलक्कड आणि तमिळनाडूतील इतर थंड प्रदेशही या उष्णतेने होरपळत आहेत. याचा परिणाम (Ooty weather) उटीवरही झाल्याचे दिसून येत आहे. तथापि, एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असूनही, वाढत्या तापमानामुळे, रिसॉर्ट्स आणि हॉटेल्सची मागणी कमी होत आहे.