दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून पराभव
नवी दिल्ली (World Cup 2025) : भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून पराभव करून आयसीसी महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक स्पर्धेचा (World Cup 2025) अंतिम सामना जिंकला आहे. आपले विजेतेपद यशस्वीरित्या राखून, (Team India) टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली आहे.
सलामीवीर गोंगडी त्रिशाच्या 44 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने क्वालालंपूरमध्ये (IND vs SA) दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट्सने पराभव केला. फक्त 83 धावांचे लक्ष्य असल्याने भारताला फारशी अडचण आली नाही. (Team India) टीम इंडियाने केवळ 11.2 षटकांत फक्त एक विकेट गमावून सामना जिंकला. त्याआधी, संपूर्ण गोलंदाजांच्या योगदानामुळे (World Cup 2025) भारताने दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 82 धावांत गुंडाळले.
भारताने सलग दुसऱ्यांदा जिंकले विश्वचषक
भारताचा 19 वर्षांखालील (Women Under-19 Team) महिला संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे. 2023 मध्ये त्यांनी अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवून विजेतेपद जिंकले आणि आता सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाने (World Cup 2025) विश्वचषक विजेतेपद जिंकले आहे.