नवी दिल्ली (Indian Congress) : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (LokSabha Elections) आपल्या वक्तव्याने काँग्रेसच्या अडचणी वाढवणारे सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या (Indian Congress) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांचा राजीनामा मान्य केले आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सॅम पित्रोदा यांच्या राजीनाम्याची माहिती दिली. (Sam Pitroda) सॅम पित्रोदा यांच्या स्वेच्छेने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सॅमने अलीकडेच भारतीयांवर केलेल्या वर्णद्वेषी वक्तव्यानंतर हे पाऊल उचलले आहे.
येथे CLICK करा: नवा वाद…भारतीयांची तुलना ‘चिनी-आफ्रिकन-अरब’ लोकांशी
श्री सैम पित्रोदा ने अपनी मर्ज़ी से इंडियन ओवरसीज कांग्रेस के अध्यक्ष पद से इस्तीफ़ा देने का फ़ैसला किया है। कांग्रेस अध्यक्ष ने उनका इस्तीफ़ा स्वीकार कर लिया है।
Mr. Sam Pitroda has decided to step down as Chairman of the Indian Overseas Congress of his own accord. The Congress…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) May 8, 2024
सॅम (Sam Pitroda) यांनी भारतातील जनतेविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर (Indian Congress) काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशाच्या विविध भागातून भारतीय कसे दिसतात, हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. सॅम पित्रोदा (Sam Pitroda) म्हणाले होते की, पूर्वेकडील लोक चिनी दिसतात, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तर भारतात राहणारे लोक गोरे दिसतात आणि दक्षिणेत राहणारे लोक आफ्रिकनसारखे दिसतात.