KL Rahul :- केएल राहुलच्या फलंदाजीची जागा बदलल्याबद्दल भारतीय संघाचे (Indian Team)माजी सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांत (Krishnamachari Srikanth यांनी संघ व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात केएल राहुलने ५ व्या क्रमांकावर शानदार कामगिरी केली होती, परंतु तेव्हापासून त्याची फलंदाजीची स्थिती बदलत आहे.
इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेत राहुलला सहाव्या क्रमांकावर पाठवले जात आहे. अक्षरला (Axar Patel) त्याच्या पदावर संधी मिळत आहे. कृष्णमाचारी श्रीकांत या निर्णयावर खूश नाहीत आणि त्यांनी यासाठी प्रशिक्षक गौतम गंभीर(Gautam Gambhir) यांनाही फटकारले आहे.
आपल्या you tube channel वर श्रीकांत बोलले,
“श्रेयस अय्यर (Shreyas Iyer )चांगल्या फॉर्ममध्ये आहे, जी भारतासाठी चांगली गोष्ट आहे, पण मला केएल राहुलबद्दल खूप वाईट वाटते. अक्षर निश्चितच ३०-४० धावा करत आहे, पण केएलसोबत जे काही घडत आहे ते बरोबर नाही. त्याचा रेकॉर्ड पहा, त्याने ५ व्या क्रमांकावर शानदार कामगिरी केली आहे, त्याचा रेकॉर्डही चांगला आहे. मला माहित नाही की संघ व्यवस्थापन त्याच्या स्थानाबद्दल काय विचार करत आहे. जर तो ६ किंवा ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करतो तर तो फक्त ६ किंवा ७ धावा करतो. हा अन्याय आहे.”
श्रीकांत यांनी गौतम गंभीरवर म्हणाले,
“गंभीर तू जे करत आहेस ते बरोबर नाही. हो, परिस्थितीनुसार, भारत अक्षरला ५ व्या क्रमांकावर पाठवू शकतो, पण ती कायमस्वरूपी रणनीती असू शकत नाही. जर तू असेच बदल करत राहिलास तर काय होईल हे तुला माहिती आहे, एक महत्त्वाचा सामना असेल जिथे सगळं काही बिघडेल, मला अक्षरबद्दल काहीही अडचण नाही, तो त्याच्या संधींचा पुरेपूर फायदा घेत आहे, पण जर तू राहुलला खाली ढकलत असशील तर पंतला ६ व्या क्रमांकावर खेळव. राहुलचा आत्मविश्वास का कमी करायचा? तो असा खेळाडू आहे ज्याने जागतिक क्रिकेटमध्ये (International cricket)उत्कृष्ट कामगिरी केली आहे.”