रोहित शर्मा कर्णधार तर हार्दिक पांड्या उपकर्णधार
नवी दिल्ली (T20 World Cup) : T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता भारतीय संघाची कमान (Rohit Sharma) रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. तर हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. केएल राहुलला संघात संधी मिळालेली नाही. संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांचा समावेश करण्यात आला आहे.
केएल राहुल, संजू सॅमसन आणि ऋषभ पंत हे संघाबाहेर?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने पुन्हा एकदा (Rohit Sharma) रोहित शर्माच्या कर्णधारपदावर विश्वास व्यक्त केला आहे. टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) तो संघाचा हार्दिक पांड्या हा उपकर्णधार असेल, तर ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना विश्वचषक संघात विकेटकीपर म्हणून स्थान देण्यात आले आहे. तसेच केएल राहुलला संधी मिळाली नाही. याशिवाय शुभमन गिल, रिंकू सिंग यांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.
असा असेल T20 विश्वचषक 2024 साठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, (Rohit Sharma) हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवराज, चहलपहल. संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज.
शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान यांचा राखीव खेळाडूंसाठी समावेश करण्यात आला आहे.