नवी दिल्ली: जागतिक किमतीत घट झाल्यामुळे एप्रिलमध्ये भारतातील पाम तेलाची आयात वार्षिक 34.11 टक्क्यांनी वाढून 6,84,000 टन झाली आहे. याबाबतची माहिती सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) ने मंगळवारी दिली .एसइएने निवेदनात सांगितल्यानुसार , एप्रिलमध्ये भारताच्या एकूण 13,04,409 टन खाद्यतेलाच्या आयातीपैकी 52 टक्के पाम तेलाचा वाटा होता. ज्यापैकी सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाची आयात 6,20,315 टन होती. अखाद्य तेलांसह एकूण वनस्पती तेलाची आयात एप्रिलमध्ये 26 टक्क्यांनी वाढून 13,18,528 टन झाली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 10,50,189 टन होती.
एसइएने म्हटले आहे की जागतिक किमतीतील मंदीमुळे रिफाइंड आणि डिओडोराइज्ड (RBD) पामोलिन आणि क्रूड पाम तेल (CPO) च्या उच्च आयातीला प्रोत्साहन मिळाले असून गेल्या महिन्यात पेक्षा ते प्रति टन US$100 ने घसरले आहे. सध्या जागतिक सोयाबीन तेलाच्या किमती 40 डॉलर प्रति टन कमी झाल्या आहेत, तर सूर्यफूल तेलाच्या किमती गेल्या महिन्यात 15 डॉलर प्रति टन कमी झाल्या आहेत. पाम तेलांमध्ये, आरबीडी पामोलिनची आयात वर्षभरापूर्वीच्या 1,12,248 टनावरून वाढून 1,24,228 टन झाली आहे.
CPO (क्रूड पाम ऑइल) आयात पूर्वीच्या 3,93,856 टनांवरून 36 टक्क्यांनी वाढून 5,36,248 टन झाली आहे. क्रूड पाम कर्नल तेलाची आयात 3,990 टनांवरून जवळपास सहा पटीने वाढून 23,618 टन झाली आहे. तेलांमध्ये, सोयाबीन तेलाची आयात २,६२,४५५ टनांवरून ३,८५,५१४ टनांपर्यंत वाढली. तथापि, सूर्यफूल तेलाची आयात 2,49,122 टनांवरून 2,34,801 टनांवर घसरली. एसइएने सांगितले की, 1 मे पर्यंत भारतात 22.45 लाख टन खाद्यतेलाचा साठा होता. भारत हा जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार देश आहे. इंडोनेशिया आणि मलेशिया हे आरबीडी पामोलिन आणि सीपीओचे प्रमुख पुरवठादार आहेत, तर सोयाबीन तेल अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून आणि सूर्यफूल तेल रशिया, रोमानिया आणि युक्रेनमधून आयात केले जाते.