पुसद (Indranil Naik) : उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात पुसद विधानसभा मतदारसंघाचे आ. इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांनी पिक विमा (Crop Insurance) संदर्भात आढावा बैठक घेऊन उंबरठा उत्पन्नाची पद्धत ही शेतकरी नव्हे तर पिक विमा कंपनीच्या हिताची असल्याची खंत या दि. 7 जुलै रोजी उपस्थित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीमध्ये व्यक्त केली. यावेळी तहसीलदार महादेवराव जोरवर, उपविभागीय कृषी अधिकारी समाधान धुळेधुळे, तालुका कृषी अधिकारी विजय मुखाडे, मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस, प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड, (Panchayat Samiti) पंचायत समितीचे कृषी अधिकारी शंकर राठोड निवासी नायब तहसीलदार गजानन कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आमदार महोदय पुढे म्हणाले की,उंबरठा उत्पन्नाची पद्धत म्हणजे मागील तीन वर्षाच्या सरासरी उत्पन्ना वरून पीक विमा ठरवण्याची पद्धत आहे, यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नसून त्यांचे नुकसान होऊन सुद्धा त्यांना विम्याचा लाभ मिळत नाही त्यामुळे उंबरठा पद्धत ही शेतकरी नव्हे तर कंपनी हिताची असल्याचे मत आमदार इंद्रनील नाईक यांनी या आढावा बैठकीमध्ये मांडले. याशिवाय अवघ्या 72 तासात शेतकऱ्यांनी विमा कंपन्याशी संपर्क आणि झालेल्या पिकांचा पंचनामा करून घ्यावा, यासाठी हा वेळ खूप कमी पडतो, हा अपुरा वेळ शेतकऱ्यांना देण्यामागे सुद्धा कंपनीचे हित जोपासल्या जात असल्याची नाराजी आ. इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांनी यावेळी व्यक्त केली.विमा कंपनीच्या प्रतिनिधींना सह उदाहरण स्पष्ट करून दिले.
मागील वर्षी अशा विविध चुकीच्या निकषामुळे तालुक्यातील पात्र असून सुद्धा नुकसान झालेल्या चाळीस हजार शेतकऱ्यांना (Crop Insurance) पिक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तारणहार ठरत असलेली पिक विमा योजनांच्या निकषा संदर्भात शेतकरी हित लक्षात घेऊन, फेरमांडणी होणे गरजेचे असल्याचे मत उपस्थित जाणकार शेतकरी वर्गाने बोलून दाखविली. बैठकीला (Indranil Naik) आ. इंद्रनील नाईक, उपविभागीय अधिकारी समाधान धुळधुळे तहसीलदार महादेवराव जोरवर, मुख्याधिकारी अभिजीत वायकोस , प्रभारी गटविकास अधिकारी टाकरस तालुका कृषी अधिकारी मुखाडे , कृषी अधिकारी शंकर राठोड यांच्यासह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी व (Panchayat Samiti) पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा विस्तार अधिकारी उपस्थित होते.