शिक्षकांनो कर्तव्यात हयगय करू नका, अन्यथा कडक कारवाई
पुसद (Indranil Naik) : तालुक्यातील आमदरी येथे रस्त्या लगत असलेल्या शाळेत ट्रक घुसल्याने एका निष्पाप 9 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी कु. शितल गंगाराम किरोले या मुलीला आपला जीव गमवावा लागला होता. अपघाता नंतर तब्बल सहा तासा नंतर अपघात ग्रस्त मुलगी मृत अवस्थेत गावकरी मंडळींना सापडली. या मध्ये शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक कामात हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न होताच त्यांना शिक्षण विभागाच्या वतीने तत्काळ निलंबित करण्यात आले.
अश्या घटना पुन्हा घडू नये आणि शिक्षकांनी आपल्या कामाचे महत्त्व लक्षात घेवुन शिक्षकांनी काम करावे, अशी ताकीद आ. इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांनी आमदरी येथे जाऊन पीडीत परिवाराचे सांत्वन केले. या भेटी दरम्यान शिक्षण विभाग आणि शिक्षकांना ताकीद दिली. मृत मुलीच्या कुटुंबीयांना विमा आणि शासनाकडून इतर सर्व स्तरावरील आर्थिक तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी आ. इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांनी पुढाकार घेतला आहे. या भेटीदरम्यान सामाजिक कार्यकर्त्या सौ मोहिनी इंद्रनील नाईक, प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार इंद्रनील नाईक यांनी गावकऱ्यांचा शांत करीत,मी तुमच्या सोबत असल्याचे ग्वाही गावकऱ्यांना दिली. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी मुलीच्या कुटुंबीयांचे नातेवाईक उपस्थित होते.