मोठ्या गिट्टीमुळे प्रदर्शनीत आलेल्यांच्या पायाला दुखापत
हिंगोली (Dussehra festival) : येथील श्री सार्वजनिक दसरा महोत्सवाची औद्योगिक व कृषी प्रदर्शनी भरविण्यात आली आहे. त्यामध्ये यंदा मोठी गिट्टी टाकल्यामुळे प्रदर्शनीत आलेल्या अनेक नागरिकांच्या पायाला दुखापत झाल्याची घटना घडली आहे. काही वयोवृद्ध या गिट्टीवरून कोसळल्याचे प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
ठोकर गिट्टीमुळे अनेक जण जायबंद
हिंगोलीतील रामलीला मैदानावर (Dussehra festival) तत्कालीन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या कार्यकाळात कोट्यावधी रूपयाचा खर्च करून मैदान विकसीत करण्यात आले होते. या मैदानावर लाल मातीचा वापर झाल्याने मागील वर्षाच्या दसरा महोत्सव प्रदर्शनीत पाऊस पडल्यावर चिखल झाला होता. त्यामुळे यावर्षी असा प्रकार घडू नये याची खबरदारी दसरा महोत्सव समितीने घेतली; परंतु प्रदर्शनीत प्रामुख्याने मुरूमाचा वापर करणे अत्यावश्यक असताना मैदानावर भरमसाठ मोठी गिट्टी टाकल्याने प्रदर्शनीत येणार्या नागरिकांची गैरसोय होत आहे. काही नागरिकांच्या पायाला दुखापत झाली तर काही वयोवृद्ध या टाळसर गिट्टीवरून खाली कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
नवरात्रीच्या उपवासामुळे अनेकजण अनवाणी
सध्या नवरात्र महोत्सव (Dussehra festival) असल्याने अनेक भावीक नऊ दिवस उपवास धरत असतात. काही नागरिक प्रदर्शनीत अनवाणी चप्पला विना आल्याने त्यांच्या पायाला मोठ्या गिट्टीमुळे दुखापत झाली. त्यामुळे दसरा महोत्सव समितीने या प्रकाराकडे लक्ष घालून प्रदर्शनीत येणार्या नागरिकांची गैरसोय दुर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.