भक्तिगीताच्या गजरात सदर पालखी रवाना!
रिसोड (Infantry Palanquin) : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रिसोड येथून पायदळ पालखी ही शिर्डीकडे (Shirdi) रवाना झाली. दिनांक 25 जून रोजी सकाळी 9 वाजता स्थानिक खोलेश्वर संस्थान येथून पायदळ पालखीची सुरुवात झाली. सदर पालखी रवाना करण्याकरिता रिसोड शहरातील भाविक (Devotee) भक्तांनी पालखीचे स्वागत रांगोळी काढून तथा फुलांचा वर्षाव करत फटाक्यांची आतिषबाजी भक्तिगीताच्या (Devotional Song) गजरात सदर पालखी रवाना केली. स्थानिक खोलेश्वर संस्थांन येथून निघत पालखी आसनगली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर आंबेडकर चौक, भाजी मंडी, लोणी फाटा, मालेगाव नाका मार्गे शिर्डी कडे रवाना झाली. यादरम्यान टाळ मृदांगाच्या नादात भक्ती गीताने रिसोड शहर अक्षरशा दुमदुमले होते. सदर पालखीमध्ये लहान मुले, युवक यांच्यासह महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. सामाजिक संस्थांकडून (Social Institutions) पालखीमध्ये सहभागी असलेल्या भक्तांसाठी चहा नाश्ता फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. पालखी मार्गात भाविक भक्तांनी पालखीचे दर्शन घेतले. रिसोड ते शिर्डी या पायदळ पालखीचे हे बारावे वर्ष असून, भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.


