लाल्या व बोंड अळीमुळे कपाशीचे घटले उत्पादन!
मानोरा (Cotton Crop Damage) : तालुक्यात अतिवृष्टी व हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन या नगदी पीकाला आधीच फटका बसला असतांना कपाशीवर लाल्या व बोंडअळी व लाल्या रोगाचा मोठया प्रमाणात प्रार्दूभाव दिसुन येत असल्यामुळे शेतकरी शेतकरी चिंतेत सापडले आहेत. शासनाने याबाबत दखल घेऊन आर्थीक मदत करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.
तालुक्यात यावर्षी हजारो हेक्टरवर (Cotton Crop Damage) कपाशीचा पेरा असून मागील वर्षाच्या तुलनेत मेाठया प्रमाणात या वर्षी पेरात वाढ झाली आहे. कापसाला चांगला भाव मिळेल या आशेने यावर्षी कपाशी पिकाकडे आकर्षित झाला आहे, मात्र अतिवृष्टी सततधार व सततच्या परतीचा पाऊस पावसामुळे कपाशीवर बोंडअळी आणि लाल्याचा मोठया प्रमाणात प्रार्दूभाव आढळून येत आहे, त्यावर शेतकरी फवारणी करुन उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत असताना मात्र कपाशीचे उभे पीक एकदम वाळत असल्यामूळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
अति पावसामुळे उडीद, मूग आदी पीके घरात न आल्यामुळे शेतकरी येणाऱ्या काळात मोठया आर्थीक संकटामध्ये सापडला आहे, तेंव्हा शासनाने आर्थाक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. माहे ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या अवकाळी मुसळधार पावसामुळे दोन येचनीत कापसाची उलगवाडी होण्याची चिन्हे दिसत असून कपाशीच्या झाडावर लाल्याने अटॅक केले आहे. त्यासोबतच (Cotton Crop Damage) बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
परतीच्या पावसा अगोदर कपाशी पिक चांगले होते, मात्र त्यानंतर ३ एकर बागायती शेतामध्ये कपाशी पिकावर लाल्या व (Cotton Crop Damage) बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने ३५ क्विंटल ऐवजी १० ते १२ क्विंटल उतारा येण्याची शक्यता आहे.
-बर्फ राठोड, शेतकरी – सोमनाथनगर




