Akola:- पातुर तालुक्यातील सुकळी येथे रोजगार हमी योजने अंतर्गत होणाऱ्या सन २०२४ / २५ मध्ये मंजूर सर्वजनिक शेततळे सर्वे नंबर ७४ / १ मध्ये होणारे शेततळे करण्याचे मंजूर होते. परंतु ई क्लास जमिन मध्ये पूर्वीपासून असलेला पाझर तलाव होता.
ई क्लास जमिन मध्ये पूर्वीपासून असलेला पाझर होता तलाव
त्याच ठिकाणी त्याच जागेवर कंत्राटदाराने जेसीबी (JCB)मशीनद्वारे त्या पाझर तलावाचे रूपांतर शेततळ्यात केले, शेततळ्याचे खोदकाम मजूराऐवजी जेसीबी मशीनद्वारे करून मजुरांच्या नावाने देयक हडपल्या प्रकरणाची चौकशीसाठी सरपंचसह ग्रामस्थांनी संबंधिताकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु संबंधिताकडून अद्यापही दखल घेतली गेली नाही, त्यामुळे सात दिवसाच्या आत शेततळ्याच्या खोदकामाची चौकशी करा अन्यथा २८ जानेवारी रोजी पासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सुकळी येथील रामभाऊ वांडे, व संतोष वांडे यांनी पातूरचे तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, यांना दिलेल्या तक्रारीतून दिला आहे. यावर काय कारवाई होते याकडे सुकळी वासीयांचे लक्ष लागले आहे.
महिना उलटूनही कारवाई करण्यास टाळाटाळ
जुने पाझर तलावाच्या ठिकाणी जेसीबी मशीनद्वारे मजुराऐवजी शेततळ्याचे खोदकाम करण्यात आल्याचा प्रकार १८ डिसेंबर २०२४ रोजी उघडकीस आला, याबाबतची तक्रार १९ डिसेंबर रोजी पातूरचे तहसीलदाराकडे सरपंचसह ग्रामस्थांनी पुराव्यासह तक्रार केली, परंतु महिनाभरापेक्षा जास्त कालावधी उलटूनही कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप होत आहे.