मानोरा(Manora):- वन पर्यटन विकास अंतर्गत मौजे पोहरादेवी येथे सुरू असलेल्या बांधकामात प्रचंड अनियमितता व भ्रष्टाचार होत आहे. सदरील विकास कामाची येत्या ७ दिवसात चौकशी करावी, अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशाराचे तक्रार निवेदन दि. ९ जानेवारी रोजी वन परिक्षेत्र(Forest area) अधिकारी ( प्रा ) यांना मोन्टी राठोड यांनी दिले आहे.
वनपर्यटन विकास अंतर्गत सुरू असलेल्या कामात अनियमितता
निवेदनात नमूद केले आहे की, पोहरदेवी येथे पर्यटन विकास अंतर्गत सुरू असलेल्या संरक्षण भिंत, तार कुंपण कामात प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. पिलर साठी वापरले जात असलेले गज गंजलेले आहे. तसेच बांधकामात माती मिसळून चुरीचे मिश्रण तयार करून अल्प सिमेंटचा वापर करण्यात करत निकृष्ट दर्जाचे (Poor quality) काम करण्यात येत आहे. सदरील कामाचे ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अंदाज पत्रक फलक लावण्यात आलेले नाही. विकास कामात पारदर्शकता नसल्याने सदरील काम थांबवून चौकशी करून योग्य ती कार्यवाही सात दिवसात करण्यात यावी, अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.