अर्जुनी मोरगाव (Arjuni Assembly Election) : येत्या २० नोव्हेंबरला संपन्न होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची सर्वत्र जोमात तयारी सुरू आहे. 63 अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात निवडणूक (Arjuni Assembly Election) संदर्भात सर्व कामे व्यवस्थितपणे पार पाडावी यावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी मिझोरम येथील विशेष सचिव रामदिनलियानी या सामान्य निरीक्षक म्हणून अर्जुनी मोरगाव मध्ये मागील आठवड्यापासून निवासी आहेत.
तहसील कार्यालय, अर्जुनी मोरगाव येथे निवडणुकीची कामे पार पाडण्याकरिता विविध विभाग कार्यरत आहेत. या विविध विभागांना सामान्य निरीक्षक रामदिनलियानी यांनी भेट देऊन सर्व विभागाची आणि त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती घेतली. यामध्ये विविध परवाना कक्ष, पोस्टल बॅलेट विभाग, खर्चाचा हिशोब विभाग, नियंत्रण कक्ष, एक खिडकी, आचारसंहिता कक्ष, मीडिया टीम इत्यादी विभागाला त्यांनी भेट दिली आणि एकूणच कार्यप्रणाली व्यवस्थित सुरू असल्याची खात्री केली सोबत काही आवश्यक सूचना केल्या. यावेळी त्यांच्या संपर्क अधिकारी श्रीमती जाखडेकर (Arjuni Assembly Election) अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वरूणकुमार सहारे तसेच अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे हे उपस्थित होते.