गोंदिया (Gondia) :- गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील ईसापूर येथील खून(Murder) प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून मेघश्यामचा खून प्रियकराच्या मदतीने केला असल्याची कबुली मृतकाच्या पत्नीने दिली आहे.
प्रेमात अडसर ठरलेल्या मेघशामला संपविण्याचा कट दोघांनी रचला
तिच्या प्रेमवीराला पळून जात असताना यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथून अटक (stuck)करण्यात आली आहे. मृतक मेघश्याम ची पत्नी वैशालीची इन्स्टाग्रामवर(Instagram) 2 वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील तेजेराव गादगे वय 22 वर्ष याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्री व प्रेमात झाले. प्रेमात अडसर ठरलेल्या मेघशामला संपविण्याचा कट दोघांनी रचला. वैशालीने त्याला गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी येथे बोलावून घेतले. तो दुपारी इसापूर येथे आला. दुपारी कुठेतरी तो थांबला. रात्री बारा वाजताच्या सुमारास तो मेघशामच्या घरी आला. वैशालीने तो येणार म्हणून घरामागचे दार उघडे ठेवले होते. त्याने प्रवेश केला त्यांनतर ठरल्याप्रमाणे दोघांनीही मेघशाम रात्री झोपी गेला असताना दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केला.
त्यांनतर सकाळी उठल्यानंतर मेघश्याम चा नैसर्गिक मृत्यू (Death)झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या घटनेचा छडा लावत मृतकाची पत्नी वैशाली व तिचा नांदेड जिल्ह्यातील प्रियकर यांना दोघांना अटक केली असून भादवीच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही 18 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.