७२ तासात तक्रारी करा म्हणता साईड बंद ठेवल्याने कारवाई होणार का?
देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (Insurance company Site) : शासनाने शेतकऱ्यांना १ रुपयात विमा योजना सुरु केली आहे.अशातच दोन ते चार दिवसांपासुन जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर पाऊस कोसळत आहे.अशातच चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने विम्याच्या ७२तासाच्या आत online तक्रारी दाखल करणे अनिवार्य आहे.मात्र विमा कंपनीची साईड बंद (Insurance company Site) असल्याने अनेक शेतकरी तक्रार करु शकत नसल्याचे समोर आले आहे.
शेतकऱ्यांच्या Ofline तक्रारी स्विकाराव्यात विनायक सरनाईक यांची कृषी विभागाकडे मागणी
तर रविकांत तुपकर यांच्यावर अपात्र शेतकऱ्यांना पात्र करण्याच्या आंदोलनामुळे गुन्हे दाखल करता तर साईड बंद असल्यानेच तक्रार लेट होते आणि कंपनी ते क्लेम रीजेक्ट करते असे म्हणत कृषी विभाग AIC विमा कंपनीवर ऐन नुकसानीच्या तोंडी साईट बंद ठेवल्याने कंपनीवर गुन्हे दाखल करणार का असा सवाल सरनाईक यांनी उपस्थित केला असुन शेतकऱ्यांच्या ofline तक्रारी विमा कंपनीने स्विकारण्याचे आदेश पारीत करावे यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणी कृषी विभाग व प्रशासनाकडे केली आहे
बुलढाणा जिल्ह्यात त्याचप्रमाणे चिखली तालुक्यात मुसळधार पाउस कासळला शेतकऱ्यांचे सोंगणी केलेले सोयाबीन व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.असे असतांना शेतकऱ्यांची ७२तासांच्या आत तक्रारी दाखल करण्याची लगबग असतांना पिक विमा कंपनीची साईट बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे तर हे (Insurance company Site) विमा कंपनी दरवर्षी शेतकरी अपात्र व्हावे यासाठीच हा प्रकार घडवून आणते आणी तक्रार लेट झाल्याचे कारण शेतकऱ्यांना दाखवीले जाते या संपुर्ण प्रकारामुळे जिल्ह्यातील आणि विशेष करुण चिखली तालुक्यातील शेतकरी वंचीत राहणार नाही.
यासाठी कृषी विभागाने विमा कंपनीस या प्रकरणी आदेशीत करावे, शेतकऱ्यांच्या ofline तक्रारी स्विकाराव्यात किवा ७२तासाच्या वर कालावधी लागल्याची जबाबदारी स्विकारावी जेनेकरुण भविष्यात शेतकरी अपात्र ठरणार नाही असी मागणी विनायक सरनाईक यांनी केली असुन कृषी विभाग जर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तुपकरांवर गुन्हे दाखल करीत असेल तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विमा कंपनीवर शेतकऱ्यांची हेळसांड झाल्या प्रकरणी व शेतकऱ्यांचे शेतातील कामात मध्ये अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हे दाखल करतील का?असा सवाल सरनाईक यांनी उपस्थित केला.जर या प्रश्नी तोडगा न निघाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.