आंतरमिडिया टी 20 क्रिकेट स्पर्धेचे शुभांगिनी खेडीकर यांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर (Intermedia T20 Cricket Tournament) : आज मंगळवारपासून आंतरमिडीया टी 20 क्रिकेट स्पर्धेला डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या वसंतनगर येथील मैदानावर खेळाला सुरुवात झाली. आंतरमिडीया टी 20 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन (Rokde Jewellers) रोकडे ज्वेलर्सच्या इव्हेंट मॅनेजर शुभांगिनी खेडीकर (Shubhangini Khedikar) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सारंगी फाऊंडेशनचे महेश सारंगी यांची उपस्थिती होती. उद्घाटनीय क्रिकेट स्पर्धा देशोन्नती विरुध्द लोकमत यांच्यात खेळली गेली. क्रिकेट प्रशिक्षक माधव बाकरे यांच्या हस्ते लोकमतचे सचिन खडके यांना मॅन ऑफ दी मॅच (Man of the Match) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ नागपूर (एसजेएएन) द्वारे 26 व्या टी 20 आंतरमीडिया क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रिंट मीडिया कर्मचार्यांसाठी वार्षिक क्रिकेट स्पर्धेला स्पोर्ट्स कर्मा, रोकडे ज्वेलर्स, सारंगी फाउंडेशन ट्रस्ट आणि स्पोर्ट्स लिंक यांचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेच्या २६ व्या आवृत्तीत गतविजेता लोकमत, गेल्या वर्षीचा उपविजेता नवभारत, द टाइम्स ऑफ इंडिया, सकाळ, तरुण भारत, लोकसत्ता,दैनिक भास्कर, पुण्यनगरी आणि देशोन्नती असे एकूण नऊ संघ सहभागी झाले आहेत.
उद्घाटनीय क्रिकेट स्पर्धा (Intermedia T20 Cricket Tournament) देशोन्नती विरुध्द लोकमत या दोन संघात खेळली गेली. देशोन्नती संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 षटकाच्या क्रिकेट स्पर्धेत देशोन्नती संघाने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत 12.3 षटकात सर्वबाद 62 धावाची कामगिरी केली. यामध्ये विनोद तोडसाम, संदीप गाणार, सतीश कांचनकर, सम्राट गोटेकर, शुभम बोरघरे, अभिजित कौरती, अतुल कौरती, कार्तिक सहारे, रोशन भुसारी, पुष्पराज बोकडे, दिलेश हजारे, पंकेश शेंडे, स्वप्नील मोरे या खेळाडूंचा समावेश आहे.
प्रत्युत्तरादरम्यान (Intermedia T20 Cricket Tournament) प्रतिस्पर्धी संघाने 9.5 षटकात पाच गड्याच्या नुकसानीवर 63 धावा काढत देशोन्नती संघावर मात दिली. मान्यवरांच्या हस्ते लोकमतचे सचिन खडके यांना (Man of the Match) मॅन ऑफ दी मॅच च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.




