अमरावती जिल्हा परिषदेचे यशस्वी आयोजन
श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाला रंगतदार सुरूवात
१४ पंचायत समितीमधील अडीच हजार खेळाडूंचा सहभाग
श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाला रंगतदार सुरूवात
१४ पंचायत समितीमधील अडीच हजार खेळाडूंचा सहभाग
अमरावती (International sports competition) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा नैपुण्य आहे. त्याला योग्य आकार व मार्गदर्शन मिळाले तर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतील पदकामध्ये भारत अग्रस्थानी राहील असा आशावाद खासदार डॉ.अनिल बोंडे (MP Dr. Anil Bonde) यांनी व्यक्त केले. श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती(डॉ.पंजाबराव देशमुख क्रीडा नगरी) येथे तीन दिवसीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२४-२५ दरम्यान आयोजन करण्यात आले.
या (International sports competition) महोत्सवाचे उद्घाटक म्हणून खासदार डॉ.अनिल बोंडे जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तरीय प्राथमिक शाळेत क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाला मंगळवारला (ता.७) सुरुवात श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात सुरुवात झाली असून या क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचे विधिवत उद्घाटन राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते झाले.
प्रारंभी लेझिम व स्वागत गीताने सर्वांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर १४ पंचायत समिती मधील सहभागी विद्यार्थ्यांचे पथ संचालन करण्यात आले.तसेच याप्रसंगी निदर्शने व विविध देखावे सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे (MP Dr. Anil Bonde) यांनी क्रीडा ज्योत पेटवून रीतसर उद्घाटन केले.
या (International sports competition) प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तिवसा येथील गटशिक्षणाधिकारी डॉ.नितीन उंडे, चांदुर रेल्वे येथील संदीप बोडखे,नांदगाव खंडेश्वर येथील कल्पना ठाकरे, वरूड तिवसा येथील विनोद गाढे, अंजनगाव तिवसा येथील श्री. भ. गीरासे,मोर्शी तिवसा येथील गुणवंत वरघट,दर्यापूर तिवसा येथील संतोष घुगे,भातकुली तिवसा येथील दीपक कोकतरे,धामणगाव रेल्वे तिवसा येथील सपना भोगावकर,अमरावती तिवसा येथील धनंजय वानखडे,अचलपूर तिवसा येथील राम चौधरी,क्रीडा संयोजक प्रवीण खांडेकर,शिक्षण विस्तार अधिकारी गंगाधर मोहने,संगीता सोनोने,मोहम्मद अशफाक व आदी उपस्थित होते.
यावेळी आपल्या (International sports competition) उद्घाटनपर मनोगतात राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे (MP Dr. Anil Bonde) म्हणाले की,आजचे विद्यार्थी भारताचे भविष्य आहे.त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदे शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करीत असतात.खेळावर लक्ष केंद्रित केल्यामुळे विद्यार्थ्यांचा विकास होत आहे.विद्यार्थ्यांच्या जीवनाचे शिल्पकार आहात.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चालना देत आहे.खेलो इंडिया मध्ये विद्यार्थी गेले पाहिजे.जिल्हा परिषदेच्यावतीने शाळांसाठी क्रीडा साठी व नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी जिल्हा नियोजन मधून मदत करू.वीज बिल मुक्त जिल्हा परिषदेच्या शाळा करायच्या आहेत.
या तिन दिवसीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचे प्रास्तविक प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.अरविंद मोहरे यांनी केले.संचालन अजय अडकीने,डॉ.प्रतिभा काठोळे यांनी केले.तर आभार प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनेने यांनी आभार मानले.असे प्रसिद्धी विभागाचे प्रमुख विनोद गाढे,विनायक लकडे,शकील अहमद,राजेश सावरकर,श्रीनाथ वानखडे यांनी कळविले आहे.
यावेळी चौदा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक, सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक व आदी उपस्थित होते. दरम्यान खेळाडू विद्यार्थी व पंच यांना शपथ डॉ.आशिष पांडे यांनी दिली.सांस्कृतिक कार्यक्रमांचे परीक्षक म्हणून प्रा.डॉ.मनोज उज्जैनकर,प्रा.अमोल पानबुडे,जान्हवी काळे हे उपस्थित आहे.
निदर्शने ठरली लक्षवेधी
या (International sports competition महोत्सव दरम्यान पंचायत समिती भातकुली येथील खोलापुर येथील विद्यार्थ्यांनी विवीधतेमध्ये एकता या निदर्शनाचे सादरीकरण करण्यात आले.यावेळी अंजनगाव पंचायत समिती मधील निंभारी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन सादर केले. तसेच मोर्शी पंचायत समिती मधील नेर पिंगळाई येथील अनुश्री सूरजूसे या ‘ मी सावित्री बोलते ‘ हे एक पात्री नाटिका सादर केली.
गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे,प्रवीण बोरकर सन्मानित
यु – डायस संगणकिय प्रणाली मध्ये राज्यातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल चांदुर रेल्वेचे गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे व प्रवीण बोरकर यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्यात द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थिनीचा गौरव
आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्यात द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या परतवाडा येथील अवंतिका ताजने या विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला.तसेच ‘ मी सावित्री बोलते ‘ ही लक्षवेधी नाटिका सादर केल्याबद्दल अनुश्री सुरजुसे हीचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी सादर केला कलेचा आविष्कार
सांस्कतिक कार्यक्रमामध्ये मंगळवारला (ता.७) भातकुली,अंजनगाव सर्जी,वरूड,धारणी,तिवसा,धामणगाव रेल्वे,दर्यापूर या पंचायत समितीमधील विद्यार्थ्यांनी आपला कलेचा आविष्कार सादर केला.तर १५ जानेवारीला मोर्शी,चांदुर रेल्वे,चांदुर बाजार,नांदगाव खंडेश्वर,अचलपूर,अमरावती,तिवसा,चिखलदरा हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे.