देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: International Yoga Day: पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवही होणार सहभागी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > International Yoga Day: पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवही होणार सहभागी
बुलडाणामहाराष्ट्रराजकारण

International Yoga Day: पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवही होणार सहभागी

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/20 at 6:30 PM
By Deshonnati Digital Published June 20, 2024
Share
Yoga

बुलडाणा (International Yoga Day) : दहावा आंतरराष्ट्रीय योगदिनाचा (International Yoga Day) मुख्य कार्यक्रम जम्मू कश्मीर येथे होणार असून, या कार्यक्रमांमध्ये भारताचे (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय आयुषमंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) हे योग प्रात्यक्षिक साधनेमध्ये सहभागी होणार आहेत. योगदिनात बुलडाणा लोकसभेचे सदस्य पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करणार असल्याची बाब बुलढाणेकरांसाठी भूषणावह आहे.

सारांश
हा तर बुलडाणेकरांचा सन्मान…जिल्हावासियांना भूमिपुत्राचे आवाहन

यंदाचा आंतरराष्ट्रीय योगदिन बुलडाणेकरांसाठी भूषणावह!

5 हजार वर्षापूर्वीपासून चालत आलेली योगसाधना ही भारतीयांची जीवन जगण्याची पद्धत होती. योग साधनेमुळे मनुष्याचे आरोग्य निरोगी राहते. सुदृढ आयुष्यासाठी योगसाधनेचे महत्त्व संपूर्ण जगाला समजल्यामुळे सर्व देशांमध्ये योग साधनेला आज अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. या योगसाधनेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी भारताचे (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष प्रयत्न केले. सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन (International Yoga Day) म्हणून साजरा करावा, असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. या प्रस्तावाला 193 देशापैकी 175 देशांनी होकार दिला. डिसेंबर 2014 मध्ये हा ठराव पारित झाला. त्यामुळे एक 21 जून 2015 ला पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन संपूर्ण विश्वामध्ये साजरा करण्यात आला. यावर्षीचं योगदिनाचे घोषवाक्य “योग स्वयम आणि समाजासाठी” हे आहे. योगाचा उपयोग स्वतःच्या आरोग्यासाठी आणि समाजाच्या स्वास्थ्याकरिता महत्त्वाचा आहे. यावर्षीचा दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन (International Yoga Day) भारताच्या वतीने जम्मू कश्मीर येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आयुषमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.

यावेळी योगाचे महत्त्व आणि योग प्रात्यक्षिक सादर केल्या जाणार आहे. योग प्रात्यक्षिकामध्ये (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आयुष्यमंत्री ना. प्रतापराव जाधव हे सहभागी होणार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात योगसाधनेला असलेलं महत्त्व आणि भारताची योगासंदर्भातील भूमिका यावेळी दोन्ही नामदार विशद करणार आहेत.

हा तर बुलडाणेकरांचा सन्मान…

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले (Prataprao Jadhav) प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आयुष राज्यमंत्री म्हणून काम करण्याची प्रथमच संधी मिळाली. मंत्री पदाचा पदभार स्वीकारून केवळ दहाच दिवस झालेले असताना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रतिज्ञा करण्याची संधी मिळाली, ही बुलढाणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

जिल्हावासियांना भूमिपुत्राचे आवाहन

जगभर योगदिन (International Yoga Day) साजरा होत असतानाच मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातही दरवर्षी जिल्हावासिय सहभागी होतात. यावेळी देखील जिल्ह्यातील नागरिकांनी ठिकठिकाणी आयोजित योगदिनात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याचा खासदार व भूमिपुत्र या नात्याने ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केले आहे.

You Might Also Like

Chandrasekhar Bawankule: शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

MLA Santosh Bangar: कळमनुरी मतदार संघातील नुकसानीची आ. संतोष बांगर यांनी केली पाहणी

Renapur Congress Andolan: रेणापूर नगरपंचायतीत काँग्रेसचे ‘जागरण गोंधळ’!

CM Devendra Fadnavis: आता नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना!

Parbhani : परभणीच्या मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी १८ कोटी मंजूर

TAGGED: Buldhana Lok Sabha, International Yoga Day, Lok Sabha constituency, pm modi, PMNarendra Modi, Prataprao Jadhav, Union Cabinet
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

पयले धुरजळ मंग गचकन बंडी उलाय झाली…!

Deshonnati Digital Deshonnati Digital June 9, 2024
Hingoli: सहा चोरीच्या मोटरसायकलसह तीन चोरट्यांना पकडले
Sonpeth Leopard: परभणीतील सोनपेठ शहरात बिबट्याचे बछड्या सह दर्शन
Chandrapur: जादूटोण्याच्या संशयावरून व्यक्तीची हत्या; तिघांना अटक 
Rain Storm wind: वादळ वार्‍याने धानपीक भूईसपाट
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Chandrasekhar Bawankule
विदर्भअमरावतीमहाराष्ट्रराजकारण

Chandrasekhar Bawankule: शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

June 13, 2025
MLA Santosh Bangar
मराठवाडाराजकारणहिंगोली

MLA Santosh Bangar: कळमनुरी मतदार संघातील नुकसानीची आ. संतोष बांगर यांनी केली पाहणी

June 13, 2025
Renapur Congress Andolan
मराठवाडाराजकारणलातूर

Renapur Congress Andolan: रेणापूर नगरपंचायतीत काँग्रेसचे ‘जागरण गोंधळ’!

June 13, 2025
CM Devendra Fadnavis
Breaking Newsनागपूरबिझनेसमहाराष्ट्रमुंबई

CM Devendra Fadnavis: आता नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना!

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?