हिंगोली (Hingoli Assembly) : विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे इच्छुक असलेल्या पाच जणांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मुलाखती दिल्या. (Hingoli Assembly) विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी होत आहे. त्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुकांसह पदाधिकार्यांची बैठक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली.
यावेळी हिंगोली विधानसभा मतदार संघात (Hingoli Assembly) रूपाली पाटील गोरेगावकर, उद्धवराव गायकवाड, परमेश्वर मांडगे, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, वसीमखाँ पठाण या पाच इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलींद नार्वेकर यांची उपस्थिती होती. यानंतर हिंगोली विधानसभा मतदार संघातील पदाधिकार्यांशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चा करून इच्छुक उमेदवारांबद्दल मते जाणून घेतली.
काँग्रेसमधील गटबाजीमुळे शिवसेनेचा दावा मजबूत
महाविकास आघाडी (Hingoli Assembly) अंतर्गत हिंगोलीची जागा काँग्रेस पक्षाकडे आहे; परंतु पक्षात गटबाजी अत्यंत टोकाला पोहचली आहे. निरीक्षकांसमोर व्यासपीठावर मारामारी आणि पोलिसांकडे तक्रार इथपर्यंत वैर वाढले आहे. यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही हिंगोलीची जागा नकोशी झाली आहे. शिवाय उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडला सोबत घेताना अध्यक्ष मनोज आखरे यांना उमेदवारी देण्याचे सांगितले असल्याचे आखरे यांचे म्हणणे आहे. यामुळे शिवसेना ही जागा घेण्याच्या तयारीत दिसत आहे.