मानोरा(Washim):- यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदार संघातील कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघात(Assembly constituencies) महाविकास आघाडी उबाठाचे उमेदवार संजय देशमुख यांना २० हजार ९६२ मतांची विक्रमी आघाडी घेत विजय मिळविल्याने शिवसेनेच्या गोटात नवसंजीवनी निर्माण झाली आहे. मात्र विधानसभा क्षेत्रात महायुतीचे सर्वच पक्ष पिछाडीवर गेल्याने आतापासूनच आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अनेक इच्छूक भावी आमदारांची धाकधूक वाढली आहे. आता विधानसभेत जनमताचा कौल कसा राहील, याचे आखाडे आतापासूनच बांधणे सुरू झाले आहे.
कारंजा – मानोरा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीला आघाडी
यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदार संघ क्षेत्रात कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. लोकसभेच्या जाहीर झालेल्या निकालानुसार लोकसभा क्षेत्रातील पुसद वगळता पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये महायुती उबाठाचे संजय देशमुख यांनी मतांची मोठी आघाडी घेत महायुती शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांचा पराभव केला. कारंजा – मानोरा विधानसभाचे भाजपाचे आमदार स्व. राजेंद्र आहेत. त्यांची निवडणूकीत प्रचाराची धुरा उमेदवार त्यांचे चिरंजीव ज्ञायक पाटणी यांनी सांभाळली. त्यांना महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देता आली नाही. त्यामुळे आगामी निवडणुक त्यांच्यासाठी धोक्याचा इशारा राहू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महायुतीचे भाजपा, शिवसेना शिंदे पक्ष, अजित पवार राष्ट्रवादी पक्ष पिछाडीवर
लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघापैकी पुसद वगळता पाचही विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आघाडी आहे. महायुतीचे भाजपा, शिवसेना शिंदे पक्ष, अजित पवार राष्ट्रवादी(nationalist) पक्ष पिछाडीवर गेल्याने या पक्षाचे भावी इच्छूक उमेदवार आमदारामध्ये धाकधूक वाढली आहे. तर महाविकास आघाडीमधील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार व काँग्रेसमधील इच्छूक भावी आमदारामध्ये नवचैतन्य संचारले आहे. तर पुढे आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकारण कसे बदलते त्यावर सर्व भिस्त अवलंबून आहे.