हिंगोली (Hingoli):- तालुक्यातील कलगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) पथकाने मारलेल्या छाप्यात अवैध दारू साठा जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला.
छाप्यात अवैध दारू साठा जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल
१० जानेवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागातील प्र. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, हिंगोली यांचे पथकाने हिंगोली परिसरातील कलगाव येथे हातभट्टी निर्मिती/विक्री केंद्रावर छापा टाकण्यात आला. सदर कारवाईत हातभट्टी १५ लिटर, रसायन ३५० लिटर असा एकुण रु.१४९१०/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन २ आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. हि कारवाई अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री टी. बी. शेख प्र.निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, हिंगोली स.दु.नि.श्री कांबळे, जवान श्रीमती पल्लवी हराळ, दिनेश राठोड, अक्षय चव्हाण वाहन चालक प्रवीण सावंत यांनी पार पाडली.