रिसोड (Washim):- रिसोड शहरातील नगर परिषद (City council)अंतर्गत सुरु असलेल्या रोड चे व समशानभूमीच्या कामाची चौकशी करून कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी समाजसेवक जियाउर खान यानी नगर परिषदेला केली आहे.
कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी
या मध्ये इंदिरानगर मधील पुलाचे व रोड चे ६ कोटी रुपयांचे बांधकाम, नगर परिषद समोरील रोड चे ६० लाखाचे बांधकाम, डाॅ सोनुने यांच्या दवाखान्या समोरील १० लाखाचे रोड चे बांधकाम व शहरातील दोन स्मशान भूमीचे ५० लाखाचे बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे (Poor quality) आहे असे तक्रारी मध्ये नमुद केले आहे. या कामाची थर्ड पार्टी मार्फत गुणवत्ता तपासण्याची सुद्धा मागणी केली असुन संबंधित कंत्राटदार यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. रिसोड शहरातील रोडचे कामे हे मंद गतिने सुरू असुन हे कामे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. अनेक रोडची सहा महिन्याच्या आतच वाट लागली आहे.नेमके कंत्राटदार आपले घर भरण्यासाठी हे काम करतात का असा प्रश्न रिसोड वाशियांना पडला आहे.
निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या कंत्राटदारावर कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा समाजसेवक जियाउर खान यांनी दिला आहे. आता संबधित नगर परिषद बांधकाम विभाग या तक्रारीची दखल केव्हा घेते याकडे लक्ष लागले आहे.