मानोरा(Washim):- तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या शेंदुरजना अढाव जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या मौजे वटफळ, मेंद्रा, इंगलवाडी व गोस्ता येथील द्वारयुक्त सिमेंट (Cement) साठवण बंधारा या विकास कामाचे खोलीकरण न करता संपूर्ण देयके काढून संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केलेला आहे.
मंत्रालय विभागाचे कक्ष अधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली
याबाबत विशेष चौकशी समितीची नेमणूक करून यंत्रणेचे दोषी अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर कार्यवाही करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निवेदन पालकमंत्री ना. संजय राठोड आणि मृद व जल संधारण अधिकारी यांना जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) सदस्या सौ नंदाबाई उकंडराव राठोड यांनी दि. २० डिसेंबर २०२३ रोजी पाठविले होते. तब्बल वर्षभरानंतर मृद व जलसंधारण विभाग मंत्रालयाचे(Department of Water Conservation Ministry) कक्ष अधिकारी प्रविण कोतमे यांनी लेखी पत्राद्वारे अमरावती विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेशीत सुध्दा केले आहे. मात्र भ्रष्ट्राचार(Corruption) करणारे अधिकारी व कंत्राटदार यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होवून अद्यापही कार्यवाही होत नसल्याने दोषीना अभय कोणाचे व कधी कार्यवाही होणार, असा प्रश्न तक्रारदार यांनी उपस्थित करून माहिती दिली आहे.
दोषीविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत
जिल्हा परिषद शेंदूरजना अढाव सर्कलमधील मौजे वटफळ, मेंद्रा, इंगलवाडी व गोस्ता येथील द्वारयुक्त सिमेंट साठवण बंधारा या कामाचे खोलीकरण न करताच सबंधित यंत्रणेचे अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमत करून शासनाची देयके काढून भ्रष्टाचार केला आहे. सदर बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने या प्रकरणी विशेष चौकशी समिती गठीत चौकशी करून दोषीविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, अश्या मागणीचे निवेदन पालकमंत्री कळविले आहे. मृद व जल संधारण विभागाचे जिल्हा जल संधारण अधिकारी व उपविभागीय जल संधारण अधिकारी उपविभाग कारंजा लाड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्याना वर्षभरापूर्वी करण्यात आले होते. सदरील तक्रारीची मंत्रालय(ministry) स्तरावर दखल घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले होते. संबंधित भ्रष्ट्राचार करणारे अधिकारी व कंत्राटदार यांचेवर चौकशी होवून कार्यवाही होण्याचे संकेत मिळाले असताना वर्षभरापासून दोषिवर कोणतीच कार्यवाही नसल्याचे दिसत आहे. आदर्श आचारसंहिता शिथिल होताच सदरील कामाची चौकशी करून संबंधितावर कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी माहिती देताना दिली.
सबंधित यंत्रणेचे अधिकारी, कंत्राटदार यांनी आगाऊ रक्कम कमावण्याच्या नादात शेंदूरजना आढाव परीसरात साठवण बंधाराचे खोलीकरण न करता शासनाच्या रकमेचा अपहार संगनमताने केलेला आहे. याबाबत झालेल्या कामाची सखोल निष्पक्ष चौकशी होवून दोषीविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी, अशी मागणी पालकमंत्री याजकडे जि. प. सदस्या सौ. नंदाबाई राठोड यांनी केली आहे.