शुभकार्य, लग्नाचे निमंत्रण व्हॉट्स अँपवरच !
परभणी/मानवत (Invitation Card) : साखरपुडा, वाढदिवस आदी शुभकार्याचे निमंत्रण पत्रिका छापून वाटप करण्याऐवजी मोबाइलवर पत्रिका पाठविण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. तरुणाईचीही याला पसंती दिसत आहे या आगोदर मानवत शहरासह ग्रामीण भागात गावोगावी जाऊन लग्नपत्रिका वितरित करावी लागत होती. त्यापेक्षा आता मोबाइलद्वारे व्हॉट्सअँपच्या माध्यमातून शुभविवाहाचे तसेच शुभकार्याचे निमंत्रण डिजिटल पद्धतीने देणे सुरू झाल्याने वेळ व पैशाची बचत होत आहे.
शुभकार्यातील समारंभाचे वेडिंग (Invitation Card) मार्केट झपाट्याने पसरत असल्यामुळे मोबाइलद्वारे ऑनलाइन निमंत्रण देण्याला चांगलेच महत्त्व आले आहे. सोशल मीडियावर डिजिटल लग्नपत्रिका पाठविण्याचे अनेक प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे, लिखित पत्रिकेऐवजी थेट डिजिटल स्वरूपातील निमंत्रण तरुणाईला अधिक जवळचे वाटते. आता निमंत्रण पत्रिका छापून वाटण्याऐवजी मोबाइलवर पत्रिका पाठविण्याचा ट्रेंड जोरात आहे.
पूर्वी घरोघरी आणि गावोगावी जाऊन लग्नपत्रिका वाटप करावी लागत होती. लग्नाचे दिवस जवळ येताच कोणाकडे निमंत्रण पत्रिका पोहोचवली नाही, याची चिंता आता डिजिटल युगात मोबाइलक्रांतीमुळे मिटली आहे. लग्नाची भरपूर प्रमाणात लग्नपत्रिका छापून त्यापैकी शहरात ग्रामीण भागात नातेवाइकांना, पाहुण्यांपर्यंत पत्रिका पोहोचवण्याचा अट्टाहास कमी झाला आहे. (Invitation Card) शुभकार्यातील धूमधडाक्यात होणाऱ्या लग्न समारंभाचा महत्त्वाचा एक भाग म्हणजे लग्नाच्या पत्रिका छापणे आणि समाजात, नातेवाईक व मित्रमंडळींना वाटप करणे हा आहे. मात्र, स्वतः घरी जाऊन पत्रिका वाटप करण्याची प्रथा मागे पडू लागली आहे. शुभकार्य डिजिटल मीडियाच्या पत्रिका आता पाठविल्या जाऊ लागल्या आहेत, अशा पद्धतीचे मोबाइलवरून मिळालेले आमंत्रण स्वीकारलेही जाऊ लागले आहे.
वेळ आणि पैशाचीही बचत
सद्याचे युग धावपळीचे झाले आहे. लग्नपत्रिका पाठविण्यासाठी भरपूर कालावधी तसेच पैसेही लागत असत परंतु (Invitation Card) लग्नपत्रिका देण्यासाठी जातांना अनेकदा अपघात होऊन जिवित वा वित्त हाणी होण्याच्याही घटना घडत होत्या त्यामानाने व्हॅटसअपवर पत्रिका पाठविल्यास वेळ आणि पैशाचीही बचत होत आहे