नवी दिल्ली (IPL 2024) : राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील या सामन्यात संजू सॅमसन चर्चेत राहिला. (Sanju Samson) संजू सॅमसनला ज्या पद्धतीने आऊट करण्यात आले होते. त्यावर अनेक क्रिकेट दिग्गजांनी आक्षेप व्यक्त केला आहे. संजू सॅमसन नाबाद असल्याचे अनेक क्रिकेट दिग्गजांचे मत होते.
संजू सॅमसनचा मोठा विक्रम
222 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल पहिल्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर जोस बटलरलाही मोठी खेळी करता आली नाही. मात्र, कर्णधार (Sanju Samson) संजू सॅमसनने एका टोकापासून संघाला ताब्यात ठेवले. यावेळी त्याने काही मोठे विक्रमही आपल्या नावावर केले. संजू सॅमसनने दिल्लीविरुद्ध चौकार आणि षटकारांची फटकेबाजी केली. यादरम्यान, तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी डावात 200 षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला.
राजस्थानच्या संघाने 20 धावांनी सामना गमावला
संजू सामसने (Sanju Samson) राजस्थान रॉयल्सकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने एका विकेटने राजस्थानला सामन्यात रोखले. नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 8 गडी गमावून 221 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून राजस्थानचा संघ 20 षटकात केवळ 201 धावाच करू शकला आणि 20 धावांनी सामना गमावला.