हार्दिक पांड्यावर IPL मध्ये बंदी?
नवी दिल्ली/मुंबई (IPL 2025) : चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून, (IPL 2025) आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पहिला सामना केकेआर (KKR) आणि आरसीबी सारख्या बलाढ्य संघांमध्ये खेळला जाईल. हा (IPL 2025) सामना ईडन गार्डन्स स्टेडियममध्येच होणार आहे. यानंतर, आणखी काही मोठ्या संघांमध्ये स्पर्धा दिसून येणार आहे.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आपला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध खेळणार आहे. चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामना 23 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. प्रत्येकजण या सामन्याची वाट पाहत आहे. कारण हा अशा सामन्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्वात मोठी स्पर्धा होते. दुसरीकडे, (Hardik Pandya) हार्दिक पंड्यावरील बंदीमुळे, रोहित शर्मा (Rohit sharma) या सामन्यासाठी संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. हार्दिक पांड्या या (IPL 2025) सामन्यात खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत, रोहित शर्माच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांचा हिरो मैदान सजवताना दिसणार आहे.
IPL 2025: मागील हंगामातील प्रकरण
हार्दिक पंड्याचा (Hardik Pandya) गुन्हा गेल्या हंगामाशी जोडलेला आहे. गेल्या हंगामात तो (Mumbai Indians) मुंबई इंडियन्सचे नेतृत्वही करत होता. खरंतर हा स्लो ओव्हर रेटशी संबंधित विषय आहे. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा ओव्हर रेट तीनदा स्लो झाला आहे. तिसऱ्यांदा असे घडल्यानंतर, पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आणि 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. (IPL 2025) योगायोगाने, गेल्या हंगामात (Mumbai Indians) मुंबई इंडियन्सचा हा शेवटचा सामना होता. यामुळेच या हंगामात (Hardik Pandya) पंड्याला पहिल्याच सामन्यात बाहेर बसावे लागणार आहे.
IPL 2025: हार्दिक गेल्या हंगामात कर्णधार
गेल्या हंगामात, मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) त्यांचा कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. यानंतर (Mumbai Indians) मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर बरीच टीका झाली. हार्दिक पांड्याला अनेक वेळा विरोधाचा सामना करावा लागला. कदाचित यावेळी ते होणार नाही. (IPL 2025) गेल्या हंगामात केकेआरने आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. त्यामुळे (KKR) केकेआरला घरच्या मैदानावर पहिला सामना मिळाला आहे आणि त्यांचा सामना आरसीबीशी होणार आहे.