हैदराबादने सहजतेने जिंकला सामना
नवी दिल्ली/ बंगळुरू (IPL 2025 SRH vs RR) : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात खूप धावा झाल्या. इशान किशनने धमाकेदार शतक झळकावत सनरायझर्स हैदराबादला 6 बाद 286 धावांपर्यंत पोहोचवले. ट्रॅव्हिस हेडनेही एक तुफानी अर्धशतक झळकावले. हैदराबादने सामना सहज जिंकला.
राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो (IPL 2025) चुकीचा ठरला. (SRH vs RR) हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मा 24 धावा करून बाद झाला पण, ट्रॅव्हिस हेडची बॅट पूर्ण जोमात होती. त्याने फक्त 21 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि 31 चेंडूत 67 धावा करून बाद झाला.
सनरायझर्स हैदराबादनेही आयपीएल 2025 ची सुरुवात दमदार केली. (SRH vs RR) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. (IPL 2025) हैदराबादकडून पहिल्यांदाच खेळणाऱ्या इशान किशनने शानदार शतक झळकावून चाहत्यांची मने जिंकली.
इशान किशनने ठोकले शतक
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात (Ishan Kishan) इशान किशनला (SRH vs RR) सनरायझर्स हैदराबादने 11.25 कोटी रुपयांना करारबद्ध केले. रविवारी (23 मार्च) ऑरेंज आर्मीसाठी इशान किशनने संस्मरणीय पदार्पण केले, त्याने फक्त 45 चेंडूत शतक झळकावले. टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा मुंबई इंडियन्सचा माजी स्टार खेळाडू किशनने हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हैदराबाद (IPL 2025) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या आयपीएल 2025 च्या तिसऱ्या सामन्यात ही कामगिरी केली.
आयपीएलमध्ये पहिले शतक
संदीप शर्माने टाकलेल्या हैदराबादच्या डावाच्या 19 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेऊन (Ishan Kishan) इशान किशनने 100 धावांचा टप्पा ओलांडला. किशनने 11 चौकार आणि सहा षटकार मारण्यात यश मिळवले. रविवारी झळकवलेले शतक हे इशानचे आयपीएलमधील पहिले शतक आहे. 28 सप्टेंबर 2020 रोजी दुबई येथे खेळल्या गेलेल्या (IPL 2025) आयपीएल 2020 सामन्यात किशनचा मागील सर्वोत्तम स्कोअर मुंबई इंडियन्सकडून आरसीबी विरुद्ध 58 चेंडूत 99 धावा होता. दरम्यान, इशान किशन पहिल्यांदाच (SRH vs RR) सनरायझर्स हैदराबादकडून फलंदाजीला आला आणि त्याने कहर केला. त्याने विकेटभोवती फटके मारले आणि संघाचा धावसंख्या 200 च्या पुढे नेला.
राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब
राजस्थान रॉयल्सची (SRH vs RR) सुरुवात खराब झाली. यशस्वी जयस्वाल 1 धाव करून बाद झाला. त्याच्यानंतर, आर रियान परागची बॅटही निकामी झाली आणि तो 4 धावा करून बाद झाला. नितीश राणा 11 धावा करून बाद झाला आणि धावसंख्या 50/3 झाली. यानंतर संजू सॅमसन आणि हद्राव जुरेल यांनी जबाबदारी स्वीकारली. सॅमसनने 26 चेंडूत आणि जुरेलने 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दोघांनीही (IPL 2025) शतकी भागीदारी केली पण लक्ष्य खूप मोठे होते. दरम्यान, सॅमसन 36 चेंडूत 66 धावा करून बाद झाला. त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 4 षटकार लागले. जुरेलने 35 चेंडूत 6 षटकार आणि 5 चौकारांसह 70 धावा काढत नाबाद राहिला.
हेटमायरने 42 आणि शुभम दुबेने 11 चेंडूत नाबाद 34 धावा करून रॉयल्सला 6 बाद 242 धावांपर्यंत पोहोचवले. (SRH vs RR) हैदराबादने हा सामना 44 धावांनी जिंकला. सिमरजीत (IPL 2025) आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.