नवी दिल्ली (IPL 2025 Suspended) : भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती आता पूर्णपणे युद्धासारखी झाली आहे. या कारणास्तव, आयपीएल 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. माहितीनुसार, (BCCI) बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.
IPL 2025 suspended with immediate effect, in view of India-Pakistan tension: BCCI sources pic.twitter.com/lY556tTAkc
— ANI (@ANI) May 9, 2025
भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाचा परिणाम आता (IPL 2025 Suspended) आयपीएलवरही स्पष्टपणे दिसून येत आहे. गुरुवारी, धर्मशाळेत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना जम्मू आणि पठाणकोटसह अनेक भागात हवाई हल्ल्यांमुळे मध्यंतरी थांबवावा लागला. स्टेडियममध्ये अचानक ब्लॅकआउट झाला आणि सुरक्षेच्या कारणास्तव खेळाडूंना तसेच प्रेक्षकांना तात्काळ बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या. या (IPL 2025 Suspended) घटनेनंतर, संपूर्ण स्पर्धेच्या भविष्याबाबतची अनिश्चितता आणखी वाढली आहे.
भारत-पाक तणावामुळे घेण्यात आला निर्णय
आयपीएलचे (IPL 2025 Suspended) अध्यक्ष अरुण धुमल म्हणाले की, परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे आणि सरकारी सूचनांची वाट पाहत आहोत. शुक्रवारी लखनौमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना सध्याच्या वेळापत्रकानुसार होणार नाही, परंतु परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
फ्लडलाइट्स बंद पडल्यामुळे खेळ थांबवला
धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाबने 10.1 षटकांत 1 गडी बाद 122 धावा केल्या, प्रभसिमरन सिंग 28 चेंडूत 50 धावांवर फलंदाजी करत होता. तर त्याचा सलामीचा साथीदार प्रियांश आर्य 34 चेंडूत 70 धावा करत होता. पण त्याला वेगवान गोलंदाज टी नटराजनने बाद केले. यानंतर (IPL 2025 Suspended) फ्लडलाइट्स बंद पडल्याने खेळ थांबवावा लागला.