हिंगोली(hingoli):- नीट युजी २०२४ परीक्षेत काही राज्यात आणि केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराची व अनियमिततेची चौकशी करून परीक्षा रद्द करावी, या मागणी संदर्भात ११ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पंतप्रधान(Prime Minister), केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना(Union Education Minister) निवेदन पाठविण्यात आले.
हिंगोलीतील महात्मा गांधी चौकात युवक काँग्रेसचे निदर्शने
याप्रकरणी युवक काँग्रेसच्यावतीने (Congress) जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले क, भारत सरकारद्वारे विविध अभ्यासक्रमाच्या व इतर प्रवेशाकरीता नीट परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. या परिक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टींग(National Testing) एजन्सी मार्फत करण्यात येत असते. परिक्षेसाठी नीट मार्फत विद्यार्थ्यांवर अनेक जाचक अटी व शर्थी लावण्यात आल्या असून अनेक विद्यार्थ्यांना लहान-सहान कारणावरून परिक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. यावर्षी नीट युजी २०२४ परिक्षेमध्ये अनेक गंभीर बाबी निदर्शनास आलेल्या असून आजपर्यंत कधीही न लागलेला असा अभूतपूर्व निकाल यावर्षी लागला आहे. काही राज्यात विशिष्ट केंद्रावरील परिक्षार्थी हे आऊट ऑफ मार्क व ९० टक्केपेक्षा अधिक टक्केवारी घेऊन उत्तीर्ण झाले आहेत तर काही सेंटरवरील विद्यार्थी हे अपुर्या सोयीसुविधा व केंद्रावरील अनियमिततेमुळे परीक्षा देऊन शकले नाहीत.
आशिर्वादामुळे नीट युजी २०२४ परिक्षेमध्येही घोटाळ्याचे लोण पसरले
काही विशिष्ट राज्यातील केंद्र चालकावर नीटच्या मेहरबानीमुळे व आशिर्वादामुळे नीट युजी २०२४ परिक्षेमध्येही घोटाळ्याचे लोण पसरले आहे. घोटाळे करून परीक्षा होणार असल्यास सरकार मलिदा देणार्यांना उत्तीर्ण करणार असेल तर सर्वसामान्यांनी वैद्यकीय क्षेत्रात(medical field) करीअरची स्वप्ने कशी पाहावी, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून या प्रकरणात झालेल्या कथित घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीविरूद्ध कठोर कारवाई करावी आणि नीट युजी २०२४ परीक्षा परत घेऊन गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दुर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर युवक काँग्रेसचे युवा नेते रणजीत पाटील गोरेगावकर, जिल्हाध्यक्ष शेख नौमान नवेद नईम, गजानन पाटील गोरेगाव, शेख अफरोज शेख फिरोज, पठाण साजीद खान, शेख शाहनवाज शेख हुसैन, स.गौस स.नुर, शालीकराम टाले, अजय डाखोरे, आकाश जगताप, रंगनाथ पाटील, नामदेव पवार आदी पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या(signatures) आहेत.