नांदेड (Nanded):- मुदखेड शहरापासून जवळपास तीन किलो मिटर अंतरावर असलेल्या मुदखेड – नांदेड रस्त्यादरम्यान सीतानदीवरील पुलाचे बांधकाम तूर्तास सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी पुल म्हणून सिमेंटचे पाईप (Cement pipe) आणि माती टाकून समांतर बाजूस मार्ग उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गुरा-ढोरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून इसापूर धरणातून(Dam) 27 मे च्या रात्री पाटबंधारे विभागाकडून(Irrigation Department) पाणी सोडण्यात आले, सोडलेल्या पाण्याची तीव्रता (Water intensity) अधिक असल्यामुळे सीता नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊ लागला. त्यामुळे पाण्याच्या वाढत्या विसर्गामुळे या मार्गावरील पर्यायी पूल चक्क खरडून वाहून गेला असून मुदखेड-वाजेगाव – नांदेड रस्त्याचा मार्ग सामान्य वाहतुकीसाठी 28 मे रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून बंद ठेवण्यात आला होता.