परभणी (Parbhani):- शहरातील इंदिरा नगर भागात राहणारा ४६ वर्षीय व्यक्ती १२ जून पासून बेपत्ता (missing) आहे. या बाबत सुरुवातीला कोतवाली पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली. याच दरम्यान सदर बेपत्ता तरुणाला नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे मारहाण झाल्याचे पुढे आले. बेपत्ता इसमाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन भोकर पोलीस ठाण्यात ३० जुनला गुन्हा नोंद झाला. भोकर आणि परभणी पोलिसांच्या घोळात अद्यापही हा व्यक्ती बेपत्ताच आहे. सदर व्यक्तीचा शोध लागेल या प्रतिक्षेत कुटूंबातील व्यक्ती आहेत.
परभणी शहरातील इंदिरा नगर येथून बेपत्ता
या बाबत अधिक माहिती अशी की, परभणी शहरातील इंदिरा नगर भागात राहणारे युसूफ खान युनुस खान वय ४६ वर्ष हे १२ जून पासून बेपत्ता झाले होते. या बाबत १८ जुनला कोतवाली पोलिसात खबर Report देण्यात आली. याच दरम्यान काही दिवसांनी युसूफ खान युनुस खान यांना भोकर येथे मारहाण (Beating) झाल्याचा प्रकार घडला. याची माहिती मिळाल्यानंतर बेपत्ता इसमाच्या भावाने ३० जून रोजी भोकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. युसूफ खान यांना १८ जून रोजी सकाळी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीनंतर युसूफ खान बेपत्ता झाले. त्यांचा शोध न लागल्याने भाऊ रसुल खान पठाण यांनी तक्रार दिली. भोकर आणि परभणी पोलिसांच्या घोळात युसूफ खान अद्यापही बेपत्ताच आहेत.
कोतवाली पोलिसांनी निकाली काढली मिसिंग
युसूफ खान बेपत्ता झाल्याबाबत कोतवाली पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली होती. याच दरम्यान १८ जुनला भोकर येथे मारहाणीचा गुन्हा नोंद झाला. या गुन्ह्याचा तपास भोकर पोलीस करत आहेत. गुन्हा नोंद झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी रसुल खान पठाण यांच्या खबरीवरुन दाखल करण्यात आलेली मिसिंग निकाली काढली. या बाबत संबंधितांना पत्राद्वारे सूचना देण्यात आली. मात्र बेपत्ता युसूफ खान अद्यापही मिळालेले नाहीत.