येलदरी चे चार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग!
हिंगोली (Isapur Dam) : उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, इसापूर धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी ३० ऑक्टोबर गुरुवार, रोजी सकाळी ६ वाजता २ व त्यानंतर तीन असे ५ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून पैनगंगा नदीपात्रात ८५४१ क्युसेक्स (२४१.८५९ क्युमेक्स) इतका विसर्ग सुरू आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे अथवा कमी करण्यात येईल. तरी, नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन इसापूर धरण पूरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.
येलदरी धरणाचे चार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग!
येलदरी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने व खडकपूर्णा धरणातून विसर्ग चालू असल्याने गुरुवारी दुपारी 4.00 वाजता येलदरी धरणाचे 2 गेट क्रमांक एक, पाच, सहा व दहा 0.5 मी. ने उचलून त्याद्वारे 8439.88 क्युसेक्स इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धरणाचा मृतसाठा 124.670 दलघमी, जिवंतसाठा 809.77 एकूण साठा 934.44, पाणीपातळी 461.772 मी. मागील 24 तासात आवक 16.704/1864.913 दलघमी तर जिवंत साठ्याची टक्केवारी 100 टक्के आहे.
