आखाडा बाळापूर (Isapur Dam Case) : शुक्रवारी सायंकाळी आखाडा – बाळापूर ते शेवाळा दरम्यान – इसापूर धरण कालवा येथे – आंघोळ करताना पाय घसरून – कालव्यात पडल्याने (Isapur Dam Case) एकाचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वसंतनगर – पुसद येथील शेख महेबूब शेख – रहमान (वय ५० वर्षे) हे – शुक्रवारी सायंकाळी शेवाळा इसापूर धरण कालवा येथे – आंघोळ करत असतांना पाय घसरून तोल जाउन कालव्यात पडले सोबतच्या मंडळीनी आरडाओरडा केला. यामुळे रस्त्यावर जाणाऱ्या मंडळीनी सदर इसमाला पाण्यातून बाहेर काढून (Isapur Dam Case) ग्रामीण रुग्णालयात हलवले.
परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. सदर प्रकरणी शेख सलीम शेख माहीतीवरून करीम आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करून पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके, शेख अनसार, राजीव जाधव, शिवाजी पवार पथकाने घटनास्थळी भेट दिली.
रमजान निमित्ताने आले होते
सदर मयत शेख महेबूब हे फकीर असुन हा मेव्हणा व बहीणीसोबत रमजानचा महिना असल्याने जकात, (Isapur Dam Case) सदका मागण्यासाठी आखाडा बाळापूर येथे आले होते. मेव्हणा अंपग असल्याने त्याचा गाडा मयत ढकलत होता. गावात, मजीद जवळ मागणे झाल्यावर कालवा येथे आंघोळीसाठी गेल्यावर ही दुर्घटना घडली.