नवी दिल्ली (ISIS Attack) : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दहशतवादी संघटना ISIS हल्ल्याच्या (ISIS Attack) कटाबद्दल मोठा खुलासा केला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाच्या दिवशी (22 जानेवारी 2024) बेंगळुरू येथील भाजप कार्यालयावर मोठा हल्ला करण्याची योजना आखण्यात आली होती, असे तपास यंत्रणेने सांगितले आहे. या दिवशी अनेक स्फोट घडवण्याचा कट आरोपींनी रचला होता.
बंगळुरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून हे उघड झाले आहे. अहमद ताहा, माझ मुनीर अहमद आणि मुझम्मिल शरीफ यांचा समावेश आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता (IPC), UA(P) कायदा, स्फोटक पदार्थ कायदा आणि PDLP कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
रामेश्वरम कॅफे स्फोट आणि तपास
1 मार्च 2024 रोजी बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या IED स्फोटात नऊ लोक जखमी झाले होते आणि कॅफेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. NIAने 3 मार्च 2024 रोजी या स्फोटाचा तपास सुरू केला. 2020 पासून फरार असलेला मुसावीर हुसेन शाजिब याने बॉम्ब पेरल्याचे तपासात निष्पन्न झाले. 42 दिवसांनंतर त्याला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली.
ISIS संबंध आणि कट्टरतावाद
NIAच्या तपासात हे आरोपी कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील रहिवासी असून ते (ISIS Attack) आयएसआयएसशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. निष्पाप मुस्लिम तरुणांना इसिसच्या कट्टरपंथी विचारसरणीने प्रभावित करण्यात हे दोघेही सक्रियपणे सहभागी होते. माज मुनीर अहमद आणि मुझम्मिल शरीफ यांनीही त्याला साथ दिली.
तांत्रिक फसवणूक आणि कट्टरतावाद
ताहा आणि शाजिब यांनी बनावट भारतीय सिमकार्ड आणि बँक खाती वापरली. याव्यतिरिक्त, त्यांनी डार्क वेबवरून डाउनलोड केलेल्या भारतीय आणि बांगलादेशी ओळख दस्तऐवजांचा देखील वापर केला. (ISIS Attack) लष्कर-ए-तैयबा आणि अल-हिंद मॉड्यूलच्या इतर आरोपींशीही त्याचे संबंध होते. NIAच्या आरोपपत्रातून हे स्पष्ट झाले आहे की, ISIS भारतात आपली मुळे पसरवण्याचा प्रयत्न करत होता आणि मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होता. सध्या या आरोपींवर कडक कारवाई करण्यात येत असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.