कोरची (Youth suicide Case) : येथून 2 कि.मी अंतरावर मौजा.कोचिनारा येथील रहिवासी श्री. किशोर चैत्राम बघवा वय 45 (मिस्त्री) यांनी अचानक 2 जानेवारी 2025 रोजी रात्रोला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी त्यांची पत्नी उठून बघताच पती वॉल कंपाऊंड लगत असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. पत्नीने आरडाओरड केली असता (Youth suicide Case) गावातील लोकांची बघण्यासाठी गर्दी जमली होती. गावातील लोकांनी पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी पीएसआय ठाकरे आपल्या पथकासह दाखल झाले.
घटनास्थळी पंचनामा करून कोरची ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले. (Youth suicide Case) नंतर त्यांच्या नातेवाईकडे शव सुपुर्त करण्यात आले. त्यांच्या पत्शात पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. त्यांच्या नीधनाबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्यावर खूप कर्ज असल्यामुळे त्याने कर्जामुळे (Youth suicide Case) आत्महत्या केली असावी, असी गावात चर्चा सुरू आहे. नेमके कारण कळू शकले नाही.