परभणी(Parbhani) :- मान्सुनच्या पावसाला सुरूवात झाली आहे. परभणी शहरात अधुनमधून पाऊस (Rain)पडत आहे. थोडा जरी पाऊस झाला तरीही वीज पुरवठा खंडीत (Power outage) होत आहे. पाऊस पडला तासभर आणि वीज गेली रातभर अशी परिस्थिती झाली आहे. वारंवार खंडीत होणार्या वीज पुरवठ्यामुळे नागरीकांचे हाल होत आहे.
महावितरणच्या कारभाराचा फटका
महावितरण कडून पावसाळापुर्व कामे लवकर पुर्ण करणे अपेक्षित होते. परभणी शहरात वीजेची समस्या गंभीर झाली आहे. थोडा जरी वारा सुटला तरी वीज पुरवठा बंद होत आहे. पावसामुळे वीज गुल होत आहे. पाऊस बंद झाल्यावर वीज पुरवठा सुरळीत होणे अपेक्षित आहे. मात्र तसे न होता. रात्र रात्रभर वीज गुल होत आहे. अंधार, मच्छर(mosquito) यामुळे रहिवाशांची अडचण होत आहे. सुरळीतपणे वीज पुरवठा होणे अपेक्षित असताना महावितरण कडून मात्र चांगली सुविधा दिली जात नसल्याचे दिसत आहे. घरगुती, औद्योगिक व्यवसायीक यांचा वीज पुरवठा खंडीत होत असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
कमी अधिक दाबाने वीज पुरवठा
वारंवार खंडीत होणार्या वीज पुरवठ्याबरोबर कमी अधिक दाबाने होणार्या वीज पुरवठ्याचाही नागरीकांना त्रास होत आहे.सर्वात जास्त लाईट बंद होणाऱ्या डीपी सुभेदार नगर दर्गा रोड, पूर्ण दर्गा रोड, खानापूर परिसर, सारंग नगर, वसमत रोड, धार रोड, जिंतूर रोड आदी भागात कमी अधिक दाबाने वीजेचा पुरवठा होत आहे. त्यामुळे विद्युत उपकरण नादुरुस्त होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. महावितरणने याकडे लक्ष द्यावे, योग्य दाबाने वीज पुरवठा करावा अशी मागणी विद्युत ग्राहकांमधून केली जात आहे.
फुझ कॉल नावालाच
लाईट बंद झाल्यावर महावितरण कडून फ्यूज कॉल नावाची एक सेवा उपलब्ध असून यावर कोणीही फोन लावून माहिती देऊ शकते मात्र फ्युज कॉल अटेंड करणारे लोक अर्ध अर्ध्या तास फोन उचलत नसल्याने नागरिकांमध्ये महावितरण बद्दल नाराजीचे सूर दिसत आहे