बीजिंग (China Army) : भारताच्या सीमेवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर (China Army) चीन हवाई दल मजबूत करत आहे. विशेषत: चीन आपल्या लढाऊ विमानांची संख्या सातत्याने वाढवत आहे. भारतावर वर्चस्व मिळवण्याचे चीनचे स्पष्ट उद्देश आहे. स्वदेशी लढाऊ विमानांच्या निर्मितीमध्ये स्वावलंबन साधण्यासाठी भारताकडे अनेक प्रकल्प आहेत. चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रूंना भारत चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. चीनने 2035 पर्यंत 100 पाचव्या पिढीचे जे-20 विमान तयार करण्याचे ठरवले आहे. पोर्टल
भारतीय संरक्षण उद्योगाला फिफ्थ जनरेशन ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) लढाऊ विमाने तयार करण्यासाठी भारत सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. AMCA हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलात समाविष्ट होईपर्यंत, चीन 1000 हून अधिक J-20 मायटी ड्रॅगन, 5 th जनरेशन लढाऊ विमान सीमेवर तैनात केले जाणार आहे. चीन केवळ 5 th जनरेशनचे लढाऊ विमान बनवण्यापर्यंत थांबणार नसून, 6 th जनरेशनचे लढाऊ विमानांचे तंत्रज्ञान बनवण्याच्या दिशेने चीन पुढे सरसावला आहे.
J-20 माइटी ड्रॅगनची शक्ती काय?
J-20 हे ट्विनजेट ऑल-वेदर स्टेल्थ 5 th जनरेशनचे लढाऊ विमान आहे. J-20 लढाऊ विमानाने 11 जानेवारी 2011 रोजी प्रथम उड्डाण केले आणि 2016 मध्ये अधिकृतपणे चिनी सैन्यात सामील करण्यात आले. चीन अजूनही आपल्या लढाऊ विमानांसाठी इंजिन तयार करण्यासाठी धडपडत आहे. AMCA ला भारतीय हवाई दलात येण्यासाठी आणि पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी 15 वर्षांहून अधिक काळ लागणार आहे. भारतीय वायुसेनेचे निवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी युरोटाइम्समध्ये लिहिले की, भारत अजूनही पाचव्या पिढीच्या विमानाचे, AMCA लढाऊ विमानाचे तंत्रज्ञान विकसित करत आहे. भारत अजूनही एरो-इंजिन, AESA रडार, EW प्रणाली, आधुनिक शस्त्रे विकसित करत आहे.
AMCA प्रकल्पासाठी बजेट किती?
भारताच्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने मार्च 2024 मध्ये AMCA च्या डिझाइन आणि विकासासाठी 15,000 कोटी रुपये किंवा सुमारे $1.9 अब्ज निधी मंजूर केला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) या विमानाच्या विकासासाठी नोडल एजन्सी असणार आहे. त्याचवेळी हे लढाऊ विमान सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे तयार केले जाणार आहे. भारतीय वायुसेनेने आधीच HAL कडे LCA Mk1A तेजस फायटर जेट तयार करण्यासाठी ऑर्डर दिली आहे. HAL आधीच भारतीय हवाई दलाची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांची क्षमता विकसित करण्यावर काम करत आहे.