Nagpur:- जय विदर्भ पार्टीतर्फे वीज दर वाढीविरोधात आज दि. २२ जुलै २०२४ ला व्हेरायटी चौक, गांधी पुतळ्यासमोर, नागपूर येथे नारे निदर्शने करण्यात आले. वीज विदर्भात तयार होत असून त्याकरीता जमीन, पाणी, कोळसा व इतरही संसाधने विदर्भाची वापरले जाते व प्रदूषणामुळे होणारे टी.बी., कॅन्सर(cancer), दमासारख्या दुर्धर आजारांचा सामनासुद्धा विदर्भाच्या जनतेला करावा लागते आणि महागडी वीज सुद्धा खरीदावे लागत आहे.
६७,४४४ कोटी रुपयांनी महावितरण तोट्यात असल्याने हि दरवाढ
जेव्हा की, विदर्भातील वीज प्रकल्पात सरासरी २ रुपये ५० पैसे दराने वीज तयार केली जाते व त्यावर विद्युत वहन आकार १ रुपया १७ पैसे प्रती युनिट दराने, इंधन समायोजन आकार ८० पैसे प्रती युनिट, स्थिर आकार १३० रुपये प्रती वीज ग्राहक व वीज शुल्क १६ टक्के दराने लादल्याने वीज बिलात १ एप्रिल २०२४ पासून अतोनात दरवाढ झाली आहे. त्यामागे महावितरण (Mahavitaran) द्वारे सांगण्यात येते कि, ६७,४४४ कोटी रुपयांनी महावितरण तोट्यात असल्याने हि दरवाढ केली आहे. परंतु वीज विदर्भात तयार होत आहे व गोवा राज्यापर्यंत वाहून नेल्या जात आहे तर त्याचा वाहन आकार आम्ही विदर्भातील जनतेने का भरावा? म्हणूनच विदर्भाच्या जनतेला वीज दरवाढ देणे लागत नाही.
विदर्भातील जनतेला वीज वहन करामध्ये दिलासा का मिळू शकत नाही ? – अरुण केदार
पेट्रोल व डीझेल च्या रिफायनरी मुंबई, बृहन्मुंबई व ठाणे जवळ असल्याने तेथील ग्राहकांना वहन शुक्लामध्ये कपात करत पेट्रोलचे दर ६५ पैस्यांनी व डीझेलचे दर २ रुपये ६ पैश्यांनी कमी करून तेथील स्थानिक जनतेला दिलासा दिला जाऊ शकतो तर विद्युत निर्मितीमध्ये अग्रणी असलेल्या विदर्भातील जनतेला वीज वहन करामध्ये दिलासा का दिला जाऊ नये असा सवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार यांनी उपस्थित केला.
‘उर्जामंत्री – हाय हाय’, ‘महाराष्ट्र सरकार – मुर्दाबाद’
विदर्भाच्या जनतेची संसाधने लागून विदर्भाच्या जनतेला महाग वीज खरेदी करावी लागते हि शोकांतिकाच म्हणून वीज दरवाढ महावितरणने मागे घेऊन विदर्भाच्या जनतेला दिलासा द्यावा असे पार्टी उपाध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. वीज दरवाढी विरोधात नारे निदर्शने करताना ‘दिल्लीत आहे वीज स्वस्त – विदर्भाची जनता मात्र दरवाढीने त्रस्त’, ‘मागे घ्या, मागे घ्या – वीज दरवाढ मागे घ्या’, ‘वीज बिलाला लागली आग – कधी येणार महाराष्ट्र सरकारला जाग’, ‘कर कर्जा नही देंगे – बिजलीका बिल नही देंगे’, ‘उर्जामंत्री – हाय हाय’, ‘महाराष्ट्र सरकार – मुर्दाबाद’ चे गगनभेदी नारे लावण्यात आले.
आंदोलन स्थळी जय विदर्भ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार, उपाध्यक्ष मुकेश मासुरकर, सहसचिव गुलाबराव धांडे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सुधा पावडे, नागपूर शहर महासचिव नरेश निमजे, नागपूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत दौलतकर, कार्याध्यक्ष भोजराज सरोदे, दक्षिण नागपूर अध्यक्ष राजेंद्र सतई, उत्तर नागपूर अध्यक्षा ज्योती खांडेकर, मध्य नागपूर अध्यक्ष रवींद्र भामोडे, दक्षिण पश्चिम अध्यक्ष अशोक पाटील, कामठी तालुकाध्यक्ष प्रशांत नखाते, जिल्हाध्यक्ष वाहतूक आघाडी अमूल साकुरे, प्रशांत तागडे सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.