अल्पसंख्याक असताना सरकारी योजनांपासून वंचित प्रचार प्रसाराची जैन समाजात गरज
अमरावती (Jain community) : जैन समाजा अल्पसंख्याक असून सुद्धा सरकारी योजना व सुविधांपासून वंचित आहे, समाज दान धर्म सहित मोठ्या प्रमाणात टॅक्स भरत असतो, देशासाठी सर्वाधिक योगदान देत असतो. मात्र यामुळे प्रशासनाला चुकीचा गैरसमज निर्माण झालेला आहे. (Jain community) जैन समाजातील सर्वच घटक श्रीमंत नसून समाजामध्ये अनेक कुटुंब असे आहेत की ज्यांना सरकारी योजना चा लाभ देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जैन आर्थिक विकास महामंडळ चे अध्यक्ष ललित गांधी (Lalit Gandhi) यांनी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकी दरम्यान केले.
सरकार योजना करत आहे, मात्र सरकारी योजनेची माहीत (Jain community) जैन बांधवा पर्यंत पोहचत नाही,मुळे जैन समाजात प्रचार प्रसार करण्याची गरज असल्याचे गांधी म्हणाले, समाजात असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना शिक्षणासाठी आर्थिक गरज आहे. अशा विद्यार्थी ना आता अल्पसंख्याक महामंडळातर्फे मदत केली जाणार आहे. काही परिवारांकडे स्वतःची घर नाही अशा लोकांनासुधा आता अल्पसंख्याक महामंडळातर्फे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, या सोबतच शिक्षणासाठी सुद्धा सवलती देणार आहे,
नव्या उद्योजकांना उद्योग करायचा असतो मात्र उद्योगासाठी पर्याप्त निधी उपलब्ध नसतो ,अशा उद्योगांना आता आर्थिक विकास महामंडळातर्फे उद्योजकांना भरारी घेण्यासाठी आर्थिक मदत करणार असल्याचे (Jain community) जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले. जैनअल्पसंख्याक विकास मंडळाचे अध्यक्ष यांनी अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्वच विभागाच्या अधिकाऱ्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत जैन आर्थिक विकास महामंडळाच्या कोणत्याही योजने पासून कोणीही समाज बांधव वंचित राहू नये असा इशारा यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आला.
जैन समाजातील (Jain community) आर्थिक धार्मिक सामाजिक व शैक्षणिक उन्नत करण्यासाठी ललित गांधी यांनी राज्यभर दौरे करत आहे, अशातच अमरावतीमध्ये त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक केली या बैठकी मध्ये मोठ्या प्रमाणात जैन बांधव सुद्धा उपस्थित होते, आतापर्यंत ललित गांधी यांनी 12 जिल्ह्यांचा दौरा केलेला असून उर्वरित जिल्ह्यांचा दौरा येत्या महिन्याभरात पूर्ण करणार असल्याचे म्हटले. येणाऱ्या काळात अमरावती जिल्ह्यात एक समिती नेमण्यात येणार आहे, या समितीमार्फत समाजामध्ये सर्वेक्षण करून जो व्यक्ती लाभापासून वंचित आहे. खरोखर लाभाची आवश्यकता अशा लोकांची यादी तयार करून त्यांना यांची निवड करण्यात येणार आहे.
या सोबतच (Jain community) जैन पाठशाला अनुदान देण्याकरता विचार होणार आहे. निराधार व विधवा महिलांना सुद्धा या योजनेतून आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी उपाययोजना केली जाणारे, या बैठकी मध्ये सकल दिगंबर जैन समाजाचे पदाधिकारी सोबतच मुक्तागिरी संस्थेचे अध्यक्ष अतुल कळमकर, शशांक चवरे उल्हास क्षीरसागर अभिनंदन पेंढारी, प्रशांत खंडारे, प्रशांत जैन, बिपिन कोठारी, अतुल सुराणा ,दर्शन जोहरापूरकर अरविंद लुकड, किशोर जैन सह मोठ्या प्रमाणात समस्त जैन बांधव उपस्थित होते.