पुसद (Jain community) : ज्ञानेश्वर भजन घर मंदिरात चातुर्मास निमित्त शहरात आलेले (Jain community) जैन समाजाचे समाधी सम्राट संत शिरोमणी आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या व आग्यानुवर्ती आचार्य १०८ समय सागरजी तसेच दक्षिण कोहिनूर अभिक्षण ज्ञानयोगी निर्यापक श्रमन मुनिश्री 108 नियम सागरजी महामुनीराज यांच्या संघस्थ द्वय मुनिराज १०८….. वृषभसगरजी महामुनीराज व मुनिश्री १०८ अभिनंदन सगरजी महामुनीराज प्रमुख उपस्थितीमध्ये व मंगल 28 जुलै रोजी शहरातील ज्ञानेश्वर मंदिरात भजन घर येथे भव्य चातुर्मास कळस स्थापना करण्यात आली.
जैन समाजात (Jain community) आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. चातुर्मासात गुरू सानिध्य लाभल्या मुळे सर्व परिसर मंगलमय झाला होता. या सोहळ्यासाठी असंख्य भाविक भक्त उपस्थित झाले होते.जैन मंदिर पासून भव्य मंगल कळस शोभायात्रा काढण्यात आली होती.लोकांच्या हस्ते संत शिरोमणी आचार्य विद्यासागर महाराज यांच्या फोटो चे अनावरण झाले मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जैन समाजाच्या साधूंनी प्रवचन केले.
यावेळी राजेंद्र जैन उमरगा, राजेश रोकडे खामगाव संगीतमय कार्यक्रमसादर .अरुणदमोह यांनी केले. राजेश आहळे उपस्थित होते. याप्रसंगी चातुर्मास निमित्य पाच मुख्य कळस स्थापन करण्यात आले. वितराग कळस पवन कुमार जैन परिवार श्रीरामपूर पुसद, सर्वज्ञ कळस श्रीमती शोभाताई आहाळे परिवार पुसद, हीतोपदेशी कळस,श्रीमती शोभाताई सोनटक्के परिवार पुसद, सद्गुरू कळस विलासराव नेटके परिवार पुसद,जीनवाणी कळस श्रीमती मनोरमा रत्नाकर रोकडे परिवार यावेळी प्रामुख्याने पुसद नगरपरिषद चे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित वायकोस, ज्ञानेश्वर संस्थान (भजन घर) चे अध्यक्ष बिपिन चिद्दरवार, उदय चिद्दरवार, नंदू चौधरी उपस्थित होते. कार्यक्रम संपन्न करण्या साठी अरींजय आहळे (अण्णा)यांचे मार्गदर्शन मिळाले तसेच नवयुवक तथा युवती मंडळ ह्यांनी अथक परिश्रम केले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादानेझाली.