Nagpur Political News:- रामटेक विधानसभेवर जवळपास २० वर्ष राज्य करणारे महायुतीचे उमेदवार आशीष जयस्वाल (Ashish jaiswal) यांचे निवडणुकीचे समीकरण काँग्रेसच्या(Congress) बंडखोर अपक्ष उमेदवारापुढे बिघडतानाचे चित्र आहे. निवडणुकीपूर्वी तथा निवडणुकीदरम्यान जयस्वालांनी रचलेले सर्व डावपेच “त्या” अपक्ष बंडखोर उमेदवाराच्या लोकप्रियतेपुढे हतबल ठरत असल्याचे दिसून येत आहे. भरीस भर म्हणजे जयस्वालाबाबत लोकांत तथा त्यांच्याच कार्यकर्त्यात असलेली नाराजी यावेळी जयस्वालांना पराजयाच्या मार्गाने अग्रेसर करीत असल्याचे चित्र सध्या दिसुन येत आहे.
काँग्रेसच्या ‘त्या’ बंडखोर उमेदवारापुढे आशीष जयस्वालांचे डावपेच फेल
उल्लेखनीय बाब अशी की, रामटेक विधानसभा निवडणुकीत उभे असलेले काँग्रेसचे तीन बंडखोर उमेदवार आपआपसात मत खातील आणि ‘तिन तिघाडा अन् काम बिघाडा ‘ असे गणित जुळून त्यात माझा एकतर्फी विजय पक्का राहील अशीच काहीशी धारणा तथा विश्वास जयस्वालांना असावा. मात्र राज्यमंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या ‘ त्या ‘ बंडखोर अपक्ष उमेदवाराने यावेळी जयस्वालांच्या या विश्वासालाही तडा दिलेला आहे. राजकारणात (politics) मुरलेला तथा आर्थिक क्षमतेने बलाढ्य असलेला ‘तो’ बंडखोर अपक्ष नेता अखेरच्या दोन दिवसात जयस्वालांना “धोबीपछाड” मारणार असल्याची वार्ता जनमानसात आहे. सात वेळा निवडून देऊनही विकास कोसो दूर आहे, आता खूप झाले, आता आम्हाला बदल हवा आहे अशी लोकातच चर्चा आहे. ही चर्चा जयस्वालांपर्यंत पोहोचली म्हणून की काय, जयस्वालांच्या चेहऱ्यावरचे पाणीच पळाल्याचे दिसून येत आहे.
‘ भूमिपुत्र ‘ पॅटर्न चालणार नाही
‘ भुमीपुत्र ‘ पॅटर्न समोर ठेवून लोकांना भ्रमित करण्याचे कटकारस्थान या निवडणुकीत चालणार नसल्याचे दिसून येत आहे. मी स्थानिक आहे, भूमिपुत्र आहे, ‘ तो ‘ बाहेरचा माणूस तुम्हाला किती साथ देईल हे सर्व मुद्दे लोकांनी यावेळी बाजूला ठेवत “आता बदल पाहिजे” हा एकच अजेंडा हाती घेतलेला आहे. हे चित्र पहाता जयस्वालांचा पराभव निश्चित असल्याचे लोकांमध्ये बोलल्या जात आहे.
.. अन् ‘ सहानुभुती ‘ चा आघात ठरणार जयस्वालांसाठी घातक
माजी राज्यमंत्री असा ठप्पा लागलेल्या काँग्रेसच्या अपक्ष बंडखोर उमेदवाराला मागील विधानसभा निवडणुकीसह (Assembly Elections) याही विधानसभा निवडणुकीत पक्ष श्रेष्ठींकडून उमेदवारी न देता डावलण्यात आले. एवढेच नाहीतर प्रबळ नेतृत्व असतांनाही ज्याच्या विजयाची शाश्वतीच नाही अशा एका नव्या चेहऱ्याला महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली. यामुळे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जनसामांन्यांना ही बाब खटकली व या उमेदवारावर खुप अन्याय झाला अशी भावना निर्माण झाल्या मुळे एक “सहानुभुती” ची लाट काँग्रेसच्या “त्या” बंडखोर अपक्ष उमेदवाराकडे वळली, आणि याच सहानुभुतीचा आघात आशिष जयस्वालांना घातक ठरणार असल्याचे जनसामान्यात बोलल्या जात आहे.