चिचारी जल जीवन मिशन चा जलकुंभ कोसळला
रात्रीची घटना सुदैवाने जीवीत हानी नाही
रात्रीची घटना सुदैवाने जीवीत हानी नाही
सोनाळा (Jal Jeevan Mission) : राजकारणी अन् अधिकारी यांच्या अभद्र युतीमुळे सातपुड्यात कंत्राटदाराने विकासाचा जन्मा आधीच गळा घोटला आहे. परिणामी आदिवासी गाव चिचारी ता. संग्रामपूर येथे जल जीवन मिशनचा जलकुंभ कोसळल्याची घटना १२ जून च्या रात्री १० वाजेच्या सुमारास उधडकीस आली. या टाकीचे ९० टक्के काम पूर्ण झाले होते. (Zilla Parishad) जिल्हा परिषद ग्रामिण (Supply Department) पाणी पुरवठा विभागाकडून जावेद अहेमद सलीम शेख नावाच्या कंत्राटदारांना कडून काम सुरू असल्याचे खामगाव चे उपकार्यकारी अभियंता थोरात यांनी सांगितले.
जि. प ग्रामिण पुरवठा विभागाचे काम
हे काम १ कोटी ७५ लक्ष रुपयाचे आहे. अत्यंत निकृष्ठ दर्जाचे काम झाल्यामुळे जलकुंभाचे कॉलम जमिनदोस्त झाले त्यावरचा जलकुंभ जमिनीवर कोसळला आहे. चिचारी गावात जलकुंभ कोसळतांना प्रचंड आवाज झाला. यामुळे भयभित गावकरी घराबाहेर आले. त्या वेळी (Jal Jeevan Mission) जलकुंभ कोसळल्याचे दिसून आले.
अधिकारी घटना स्थळावर फिरकलेच नाही
रात्रीची ही खळबजनक घटना असतांना (Zilla Parishad) जिल्हा परिषदेचे अधिकारी घटनास्थळी फिरकलेच नाहीत. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. चोर चोर मावसेरे भाई एकत्र आल्याने या कामात मोठा गडबड घोटाळा झाला आहे. या बाबत आदिवासी रोष व्यक्त करित आहेत. कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे.