रिसोड (Jal Jeevan Mission) : रिसोड तालुक्यातील मोप येथील जल जीवन योजनेचे (Jal Jeevan Mission) काम मागील तीन वर्षांपासून सुरू असलेले काम मात्र अद्यापही पूर्ण झालेले नाही. मोप ग्रामस्थांना स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतरही पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. (Jal Jeevan Mission) जल जीवन मिशन कोट्यवधी रुपयांची योजना आमच्या गावाला मंजूर होऊनही काय उपयोग असा, उपरोधक सवाल मोप ग्राम पंचायत चे सरपंच यांच्यासह ग्रामस्थ प्रशासनाला करत आहेत.
मोप सरपंचासह महिलांचे सीईओंना निवेदन
जिल्ह्यामधे जलजीवन मिशन योजना (Jal Jeevan Mission) म्हणजे एक अपूर्ण “मिशन” ठरत आहे. त्यातीलच एक असलेल्या मोप गावामधे जल जीवन मिशन योजनेचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू झाले. मात्र अद्यापही सदर लोकोपयोगी योजनेचे (Jal Jeevan Mission) काम पूर्णत्वास जाऊन गावकऱ्यांना हक्काचे हंडाभर पाणी मिळत नसल्याने सरपंच सदस्य तसेच शेकडो महिला आक्रमक होत. त्यांनी गटविकास अधिकारी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. यामधे त्यांनी पुढील एक महिन्यात जर आम्हाला हक्काचे पिण्याचे पाणी मिळवून दिले नाही तर, आम्ही असहकार आंदोलन करणार असल्याचे सरपंच यांचेसह ग्रामस्थांनी सांगितले आहे.
तोडगा न निघाल्यास असहकार आंदोलनाचा इशारा
स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतरही आमच्या गावातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा कायम आहे. (Jal Jeevan Mission) जल जीवन मिशन योजने अंतर्गत कोट्यावधींचा निधी मागील तीन वर्षापासून मंजूर झाला. परंतु अद्यापही त्या निधीचा विनियोग करून आम्हाला पिण्याचे पाणी मिळाले नाही. एक महिन्यामध्ये जर आमची समस्या मार्गी लागली नाही तर आम्ही असहकार आंदोलन पुकारणार आहोत.
– भागवत नरवाडे, सरपंच मोप