हिंगोली ((Jaleshwar lake) : जलेश्वर तलावाचे (Jaleshwar lake) सौंदर्यीकरण केले जात आहे. त्या निमित्ताने गाळ उपसा केला जात असून, भविष्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी (Hingoli Municipality) नगर पालिकेच्या पथकामार्फत मंगळवारी सर्वेक्षण करण्यात आले आहे.
आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी (Jaleshwar lake जलेश्वर तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचा संकल्प केल्यामुळे आता या कामाला अधिक गती आली आहे. जलेश्वर तलावाच्या चौहीबाजुने संरक्षण भिंत उभारली जात आहे. तसेच प्रत्येक दिवशी शेकडो टिप्पर व ट्रॅक्टरमधुन तलावातील गाळ उपसा करून अनेक शेतकरी शेतामध्ये गाळ नेऊन टाकत आहेत. गाळ उपसा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या तलावातील गाळ काढल्यानंतर पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्याकरिता एका लेव्हलद्वारे पाईप टाकले जाणार आहेत. त्यासाठी (Hingoli Municipality) नगर पालिकेच्या पथकाने मशिनद्वारे सर्वेक्षण केले.
नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, स्थापत्य अभियंता प्रदिप नाईक यांनी सर्वेक्षणानंतर कंत्राटदारास काही सूचना दिल्या. (Jaleshwar lake) तलावातील पाणी काढण्याकरिता बांधकाम करण्यात येत असलेल्या वॉशऑऊट चॅनलसाठी ही लेव्हल उपयुक्त ठरणार असून, संपूर्ण तलावातील पाणी वॉशआऊट चॅनलपर्यंत येणार आहे. त्यामुळे या कामाला अधिक गती देण्यात आली आहे.