जळगाव (Jalgaon) : पुणे येथील आयआयसीएमआर संस्थेच्या (IICMR Institute) वतीने झालेल्या ‘उडान’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (University of Maharashtra) व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या (School) विद्यार्थ्यांनी विविध श्रेणीत 2 विजेतेपद आणि 2 उपविजेतेपद प्राप्त केले. गेल्या आठवड्यात ही स्पर्धा पार पडली.
‘शरलॉक होम्स फाइंड्सद केस’ या श्रेणीत अलोक माळी, मेघना वार्डे यानी विजेतेपद आणि मनिषा जोधा, सुमेथ शिरतुरे यानी उपविजेते पद प्राप्त केले. तर ‘आयडीएशन बीझस्पार्क’ गटात नयन पाटील, मेघना भोळे, अंजली सोनार व भावना कुमावत यांना उपविजेते पद आणि’ कार्पोरेट चाणक्य’ श्रेणीत प्रथम धम्मरत्न, भाग्यश्री पाठक, भक्ती सपकाळे, व शितल पाटील यांच्या संघाने विजेते पद प्राप्त केले. या स्पर्धेतील दामिनी पाटील यानी विद्यार्थ्यांना (Student) मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे समन्वयक व मार्गदर्शक डॉ. आर. आर. चव्हाण यांनी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन (Guidance) केले. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यानी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रशाळेच्या संचालक प्रा. मधुलिका सोनवणे, प्रा. रमेश सरदार, डॉ. आर. आर. चव्हाण उपस्थित होते.