Jalna :- मराठा समाजासह सर्व समाजाला माहित होत जरांगेंचं (Manoj Jarange) आंदोलन म्हणजे फुसका बार ठरणार आहे. जरांगेंच्या मुसक्या आवळण्या सुरु आहे, जरांगेंच्या बुडावर लाथ घालून बाहेर काढले पाहिजे, मराठा समाजात विद्वान माणसे आहेत. जरांगे यांच्यासारख्या बालिश माणसाकडे नेतृत्व ठेवू नये, असं नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.
जरांगेंच्या मुसक्या आवळण्या सुरु आहे, जरांगेंच्या बुडावर लाथ घालून बाहेर काढले पाहिजे
57 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) वाटप करण्याचे पाप काही महिन्यांपूर्वी शिंदे सरकारने केलं आहे, नवनाथ वाघमारेंनी थेट सरकारवर आरोप केला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)करीत असतील, निवडणुकीच्या काळात आमचा डीएनए ओबीसी (OBC)आहे, असं म्हटले होते. ओबीसी डीएनए आहे म्हणून पाठीत खंजीर खुपसत असाल तर ओबीसी यावर विचार करेल, देवेंद्र फडणवीस दुटप्पी भूमिका घेतायेत का? फडणवीस जरागेंना घाबरतायत का? बालिश नेत्याच्या दबावापोटी फडणवीस यांनी ओबीसी पाठीत खंजीर खुपसण्याच काम केलं, ओबीसीने सरकारने दिलं असून, येणाऱ्या निवडणुकीत ओबीसींना विचार करावा लागेल, असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी देवेद फडणवीस यांना दिला आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणी धनंजय मुंडेवर (Dhananjay Munde)आरोप होतायेत, आरोप सिद्ध झाल्यास सरकार राजीनामा घेतील, संतोष देशमुख यांच्या कुटुंबांला न्याय मिळाला पाहिजे, अशी दुटप्पी भूमिका सुरेश धस घेतायत, असं नवनाथ आबा वाघमारे यांनी म्हंटलय.